Uddhav Thackeray: ”कोणी किती अफजल खान आले तरी मला त्याची पर्वा नाही”

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: नवी दिल्लीमध्ये शिवसेनेच्या भवितव्याची सुनावाणी सुरु आहे. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांना भेटत आहेत. आज उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसैनिक उद्धव ठाकरेंना भेटायला मुंबईमध्ये आलेले आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा बंडखोरांवरती टीका केली आहे. तर खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांचं कौतुक केलं आहे.

उद्धव ठाकरे शिवसैनिकांसमोर काय म्हणाले?

”आत्ताच जे वातावरण आहे ते भारावून टाकणारं आहे. आई भवानीचा आशीर्वाद असल्यावर कोणी किती अफजल खान आले तरी मला त्याची पर्वा नाही. दसऱ्याला आपण भेटणारच आहोत, एक चांगली सुरुवात झाली आहे. दुसरी केस न्यायालयात सुरू आहे. माझा आई भवानी आणि न्यायदेवतेवरती विश्वास आहे. न्याय आपल्याला मिळणार आणि मिळालाच पाहिजे, तुळजाभवानीच्या दर्शनाला मी येणारच आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

ओमराजे निंबाळकर रक्त पाळतोय- उद्धव ठाकरे

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले ”मला धाराशिव जिल्ह्याचं विशेष अभिनंदन करायचं आहे कारण कैलासने काय पराक्रम केला आहे हे सर्वांना माहिती आहे. ओमराजे देखील कसा रक्त पाळतोय हे तुम्ही देखील बघितलं आहे. तुमच्या आधी जालनाचे लोक आले होते जालनाची परिस्थिती काय आहे सर्वांना माहिती आहे. परिस्थिती काय आहे हे तुम्हाला माहिती आहे अशीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात आहे. ज्यांना तुम्ही मोठे केले ते खोक्यात गेले” अशी टीका बंडखोरांवरती केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

”मी तर अजून घराच्या बाहेर पडलो नाहीये. ज्या क्षणी मी वर्षा सोडून मातोश्रीत आलो तेव्हापासून असे शिवसैनिक मातोश्रीवर येत आहेत. जर शिवसैनिक बोलले असते तर एक मेळावा इथेच झाला असता. दसरा मेळाव्याच्या कितीतरी पटीने एक मिळावा इथेच झाला असता असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले ”मला फोन येत आहेत कुठेही काही आपलं वाकडं झालेलं नाही. भवानी मातेची कृपा आहे, ती कृपा नाही तर खरं कोण आणि चुकीचं कोण हे दाखवून दिलं आहे. शिवाजी महाराजांना भवानी मातेने जशी तलवार दिली अशी श्रद्धा आहे तसंच तुमच्याकडे बघून मला असं वाटतंय की भवानी मातेने मला ही तलवार दिली आहे.”

    follow whatsapp

    ADVERTISEMENT