Shiv Sena: ‘शिंदेंचे 22 आमदार, 9 खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात’, पुन्हा भूकंप होणार?
Politics of Maharashtra: शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार आणि 9 खासदार हे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत असा दावा खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
ADVERTISEMENT

Maharashtra Political News: दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर: ‘जवळपास 22 आमदार आणि नऊ खासदार माननीय उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सर्वांच्या संपर्कात आहेत.’ असा गौप्यस्फोट शिवसेना (UBT) पक्षाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केलं आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. विनायक राऊतांचा हा दावा खरा ठरला तर राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप येऊ शकतो. त्यामुळेचा आता त्यांच्या या दाव्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. (22 shinde mla 9 mps in touch with thackeray again will there be a political earthquake vinayak raut made a big claim)
एकनाथ शिंदे गटातील आमदार-खासदार हे आमच्या संपर्कात आहेत. असं विनायक राऊत म्हणाले आहेत. मंत्री शंभूराजे देसाई यांनी प्रतिआव्हान दिलं होतं याबाबत बोलताना खासदार विनायक राऊत यांनी हा खुलासा केला आहे.
कोल्हापुरात ते माध्यमांशी बोलत होते. ठाकरे गटाच्या कोल्हापुरातील कार्यकर्त्यांच्या एका खाजगी कार्यक्रमाकनिमित्त खासदार विनायक राऊत, दिवाकर रावते हे आले आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
विनायक राऊतांचा शिंदे गटाच्या आमदारांबाबत खळबळजनक दावा
‘मंत्री शंभूराजे देसाई यांना काय करायचे ते करू द्या, एक मात्र नक्की की, शिंदे गटामध्ये गेलेले बऱ्याच आमदारांमध्ये असंतोष खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्या असंतोषाला पहिली वाचा ही गजाभाऊ कीर्तिकर यांनी फोडली आहे. असे अनेक आमदार आहेत की ज्यांचा भ्रमनिरास झाला आहे. 50 खोके आणि कोट्यावधी रुपयांची निधी देण्याचे कबूल करण्यात आले. पण आता तसं काही घडताना दिसत नाही.’









