'शिर्डीत एका बिल्डिंगमध्ये 7000 मतदारांची नोंद अन् भाजपा..' PM मोदींसमोरच राहुल गांधींचे गंभीर आरोप
Rahul Gandhi: शिर्डीमध्ये एकाच इमारतीमध्ये 7 हजार मतदारांची नोंद झाली आहे. असं म्हणत राहुल गांधींनी लोकसभेत बोलताना एक मोठी मागणी केली आहे.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज लोकसभेत 'फायर' मूडमध्ये दिसले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर संसदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत गंभीर आरोप केले. राहुल म्हणाले की, लोकसभा निवडणुका आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमधील काही महिन्यांतच राज्यातील मतदारांची संख्या हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतकी वाढली आहे.
ते म्हणाले की, निवडणूक आयोगाने राज्यातील विरोधी पक्षांना मतदार यादीशी संबंधित डेटा पुरवावा. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेत भाग घेताना त्यांनी असेही म्हटले की, ते कोणतेही आरोप करत नाहीत परंतु आयोगाने त्याचे उत्तर द्यावे.
हे ही वाचा>> 'बुरखा पोरीच घालतात..कॉपी काय फक्त पोरीच करतात? उद्या साड्यांवर..', जितेंद्र आव्हाडांचा नितेश राणेंवर हल्लाबोल
राहुल गांधी म्हणाले, 'महाराष्ट्र निवडणुकीशी संबंधित काही आकडेवारीकडे मी या सभागृहाचे लक्ष वेधू इच्छितो. लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान, हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके लोक महाराष्ट्राच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले. अचानक 70 लाख नवीन मतदार आले.
ते म्हणाले की, महाराष्ट्रात पाच वर्षांत जितके मतदार वाढले आहेत त्यापेक्षा पाच महिन्यांत जास्त मतदार वाढले आहेत. राहुल गांधींनी दावा केला की, 'शिर्डीतील एका इमारतीत 7 हजार मतदारांची नोंदणी झाली. मनोरंजक म्हणजे, नवीन मतदार बहुतेक अशा मतदारसंघांमध्ये जोडले गेले जिथे भाजपला आघाडी मिळाली.'










