'अंथरुण-पांघरुण घ्या..', मतमोजणी पुढे ढकलल्यानंतर अभिजीत बिचुकले आक्रमक, शरद पवारांचा दाखला देत म्हणाले...

मुंबई तक

Abhijeet Bichukale on vote counting was postponed : 'अंथरुण पांघरुण घेऊन...', हायकोर्टाने मतमोजणी पुढे ढकलल्यानंतर अभिजीत बिचुकलेंची आक्रमक प्रतिक्रिया; शरद पवारांचा दाखला देत व्यक्त केल्या भावना

ADVERTISEMENT

Abhijeet Bichukale on  vote counting was postponed
Abhijeet Bichukale on vote counting was postponed
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मतमोजणी पुढे ढकलल्यानंतर अभिजीत बिचुकलेंची आक्रमक प्रतिक्रिया

point

शरद पवारांचा दाखला देत अभिजीत बिचुकले म्हणाले...

Abhijeet Bichukale on vote counting was postponed : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालासंदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय सुनावला. काही नगरपरिषदांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे राज्यातील जवळपास 20 नगरपरिषदांसाठीची मतदान प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. या निवडणुका 20 डिसेंबरला घेण्याचे ठरले होते. त्यामुळे सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत, अन्यथा या 20 नगरपरिषदांच्या निकालांवर परिणाम होऊ शकतो, अशी मागणी करत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती.

मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार 

या याचिकेवरील सर्व बाजूंची मांडणी ऐकल्यानंतर खंडपीठाने सर्व नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी, म्हणजेच 21 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले. आज मतदान झाले असले तरी त्याचे निकाल 21 तारखेलाच घोषित करावेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. याशिवाय, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे एक्झिट पोल 20 डिसेंबरला मतदान पूर्ण झाल्यानंतर अर्ध्या तासाने जाहीर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच या निवडणुकांची आदर्श आचारसंहिता 20 डिसेंबरपर्यंत लागू राहील, असेही न्यायालयाने नमूद केले. दरम्यान, निवडणुकांची मतमोजणी पुढे ढकलल्यानंतर अनेक उमेदवारांचा आणि मतदारांचा देखील हिरमोड झालाय. न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आता सातारा नगरपालिकेचे अपक्ष उमेदवार आणि लोकप्रिय अभिनेते अभिजीत बिचुकले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अभिजीत बिचकुलेंची आक्रमक प्रतिक्रिया 

अभिजीत बिचुकले म्हणाले, "आज मतदान झाल्यानंतर निकाल हा 20 दिवसानंतर आहे. माझी सगळ्या महाराष्ट्रातील नगरपरिषदा नगरपंचायतीच्या निवडणुकांना प्रत्यक्ष उभा राहिलेल्या सगळ्या अपक्ष आणि पक्षीय उमेदवारांना विनंती करणार आहे. मी त्यांना आवाहन करतोय की, निकालाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी मतपेट्या ठेवल्या जातात त्या ठिकाणी अंथरुण पांघरुण घेऊन मुक्कामाला जावा. भाजप काहीही करू शकतं, असं शरद पवारांनी सांगितलं होतं. ते खरं ठरू शकत म्हणून ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवलेल्या आहेत, तिथेच मुक्कामी जावा गडबड होण्याची शक्यता आहे. मी सेलिब्रेटी म्हणून सांगतोय." मतदानाचा अधिकार बजावल्यानंतर अभिजीत बिचकुले यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

अभिजीत बिचुकले हे सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर बिचुकले यांनी त्यांच्या टिपिकल स्टाईलमध्ये सत्ताधारी नेत्यांवर जोरदार टीका केली होती. “माझ्या हातात सातारा द्या… साताऱ्याचा ‘सितारा’ करून दाखवतो! आता माझ्यासाठी ही लढाई ‘मरा किंवा मारा’ अशी आहे.” गेल्या पंचवीस वर्षांपासून साताऱ्यात तोच-तोच प्रश्न, खड्डे, रखडलेली कामं आणि संथ विकास पाहून आता मीच बदल घडवणार, असा दावा बिचुकले यांनी केला होता. .

हे वाचलं का?

    follow whatsapp