Uddhav Thackeray: 'आदित्य, तेजसही 'काका' बोलायचे तोच माणूस उलटला...', 'त्या' बंडामुळे उद्धव ठाकरे अजूनही...

मुंबई तक

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे झाले भावूक
उद्धव ठाकरे झाले भावूक
social share
google news

Uddhav Thackeray: धाराशिव: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड आणि त्यानंतर शिवसेना हा पक्षच ताब्यात घेणं हे उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जिव्हारी लागलं आहे. याच मुद्द्यावरून ते सातत्याने टीका करत आहेत. पण आज (8 मार्च) धारशिव जिल्ह्यातील कळंबमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत याचबाबतची अस्वथतता पुन्हा एकदा बाहेर आली आहे. (aditya tejas also used to call him uncle but same people rebelled against us saying this uddhav thackeray became emotional shiv sena eknath shinde)

आतापर्यंत उद्धव ठाकरेंनी बंड करणाऱ्या आमदार आणि खासदारांवर बऱ्याचदा जहरी टीका केली आहे. मात्र, आज भाषणात त्यांनी त्यांच्या मनातील खंत बोलून दाखवताना आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंचा देखील उल्लेख केला.

हे ही वाचा> 'लोकसभेच्या उमेदवारीसाठी नार्वेकरांनी...', ठाकरेंच्या विधानाने खळबळ

'घरातील कुटुंबीयांसारखं मी त्यांच्याशी वागलो. अगदी आदित्य काय, तेजस काय.. ते सुद्धा काका-काका बोलत होते. आम्हाला तो एक धक्का होता की, अरे... आपल्या घरातील माणूस एवढा उलटा फिरू शकतो?' असं म्हणत उद्धव ठाकरे यावेळी काहीसे भावूक झाल्याचंही दिसून आलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

...अन् उद्धव ठाकरे झाले भावूक

'काही जणांना मी माझ्या लहानपणापासून बघत आलोय. काही जणांना त्यांच्या लहानपणापासून बघत आलोय. शिवसेनाप्रमुखांनी त्यांना भरभरून दिलं. आम्ही त्यांना भरभरून दिलं.. घरातील कुटुंबीयांसारखं मी त्यांच्याशी वागलो. अगदी आदित्य काय, तेजस काय.. ते सुद्धा काका-काका बोलत होते.' 

'आम्हाला तो एक धक्का होता की, अरे... आपल्या घरातील माणूस एवढा उलटा फिरू शकतो? एवढा उलटा फिरतो.. आणखी मी काय देऊ?' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदेंवरच निशाणा साधला.

ADVERTISEMENT

'बाळासाहेबांना दिलेला शब्द अजून पूर्ण झाला नाही..'

'एक गोष्ट खरी आहे की, माझ्या मनात कधी मुख्यमंत्री पद नव्हतंच.. पण परिस्थिती अशी निर्माण झाली की, भाजपने आपल्या पाठीत वार केला, दगा दिला.. होय वार केलाच..' 

ADVERTISEMENT

'मी काल तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगितलं आहे की, अमित शाहांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांच्या खोलीत.. ज्याला आम्ही मंदिर मानतो. त्या खोलीमध्ये हा शब्द दिला होता आणि नंतर तो शब्द त्यांनी नाकारला..' 

हे ही वाचा> 'लोकसभेच्या उमेदवारीसाठी नार्वेकरांनी...', ठाकरेंच्या विधानाने खळबळ

'मी बाळासाहेबांना वचन दिलं होतं... त्यांच्या शेवटच्या काळात मी त्यांचा हात हातात घेऊन सांगितलं होतं की, तुम्ही काळजी करू नका.. आपल्या शिवसेनेचा मी मुख्यमंत्री करून दाखवेन.'

'मी मुख्यमंत्री होईन हे वचन नव्हतं.. त्यामुळे माझं वचन अपूर्णच आहे. मला शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचाच आहे. कारण मी बाळासाहेबांना वचन दिलंय. ते वचन मला असं वाटलं होतं की, भाजप पूर्ण करेल त्यांनी तर नालायकपणा केला.. आता हे वचन पूर्ण करण्याची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतोय.'

'अगदी आता त्यांच्यासोबत गेलेले बच्चू कडू आणि सगळे हे सांगतायेत.. भाजप  वापरा आणि फेकून द्या असं वागंत..' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT