'अशोक चव्हाणसुध्दा आता काँग्रेसवर दावा सांगून हात...' राजीनाम्यानंतर राऊतांची खोचक पोस्ट
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या राजीनाम्यावर आता खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत त्यांनी एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याप्रमाणेच अशोक चव्हाणही आता काँग्रेसच्या हात चिन्हावर दावा करणार का असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
चव्हाणसुध्दा आता काँग्रेसवर दावा सांगणार का?
कालपर्यंत ते सोबत होते आता भाजपमध्ये गेले
'मिंध-अजित पवारांसारखेच अशोक चव्हाणसुद्धा...'
Ashok Chavan : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडत असतानाच आज पुन्हा एकदा काँग्रेस (Congress) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Former Cm Ashok Chavan) भाजपमध्ये जाणार असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. मात्र आज अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने ते आजच भाजपमध्ये (BJP) प्रवेश करतील अशी चर्चा सुरु आहे. एकीकडे हे चालू असतानाच खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर ट्विट करत त्यांनी, 'अशोक चव्हाण भाजपवासी झाले असून त्यावर आता विश्वास बसत नाही' असा टोलाही त्यांनी सोशल मीडियावरून लगावला आहे.
ADVERTISEMENT
प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
आमदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे सोशल मीडियावर त्यांनी जाहीर केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या राजीनाम्यावर खोचक पोस्ट केली आहे.
मिंधे-अजित पवारांप्रमाणेच शिंदे
गेल्या काही दिवसांपासून ते बरोबर होते, आणि आता एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्या प्रमाणेच अशोक चव्हाणही काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय अशी खोचक पोस्ट राऊतांनी केली आहे.
हे वाचलं का?
चव्हाणांचा काँग्रेसवर दावा?
खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर त्यांच्या राजीनाम्याविषयी पोस्ट शेअर करत त्यांनी अनेक सवालही उपस्थित केले आहेत. यावेळी त्यांनी म्हटले आहे, 'एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्या प्रमाणे चव्हाणसुध्दा आता काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय?' असा सवाल करून त्यांनी शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला जोरदार टोला लगावला आहे.
हे ही वाचा >>Devendra Fadnavis : अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर? फडणवीस म्हणाले, 'मला विश्वास...'
निवडणूक आयोगा काय करणार?
यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाने शिवसेना आणि राष्ट्रवादीविषयी दिलेल्या निर्णयामुळे त्यांनी अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावरून त्यांनी सवाल उपस्थित केले आहेत. यावेळी त्यांनी अशोक चव्हाण काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय असं म्हणत त्यांनी निवडणूक आयोग त्यांना ते देणार काय म्हणत आपल्या देशात काहीही घडू शकते असा खोचक प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
आमदारकीचा राजीनामा
अशोक चव्हाणांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत सोमवारी आपण भोकर विधानसभा मतदार संघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात आणखी काय घडणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Shiv Sena : राऊतांचा CM शिंदेंना सणसणीत टोला, आम्ही हनुमान, लंका....
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT