Exclusive: भाजपसोबत घरोबा, अमोल मिटकरी म्हणतात, ‘RSS ची विचारधारा मरेपर्यंत…”
अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांची आज मुंबई Tak चे संपादक साहिल जोशी आणि अभिजीत करंडे यांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली. या मुलाखतीत अमोल मिटकरी यांनी अनेक मुद्यावर सविस्तर उत्तर देत मोठे खुलासे केले आहेत. आरएसएसची विचारधारा मरेपर्यंत स्विकारणार नाही, जिथे विरोध होता तिथे विरोध कायम राहणार,अशी स्पष्ट भूमिका अमोल मिटकरी यांनी मांडली आहे
ADVERTISEMENT
Maharashtra Political Latest News : अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांची आज मुंबई Tak चे संपादक साहिल जोशी आणि अभिजीत करंडे यांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली. या मुलाखतीत अमोल मिटकरी यांनी अनेक मुद्यावर सविस्तर उत्तर देत मोठे खुलासे केले आहेत. आरएसएसची विचारधारा मरेपर्यंत स्विकारणार नाही, जिथे विरोध होता तिथे विरोध कायम राहणार,अशी स्पष्ट भूमिका अमोल मिटकरी यांनी मांडली आहे.(ajit pawar group amol mitkari big statement on rss mumbai tak exclusive interview)
माझी विचारधाराही शिव, शाहु, फुले, आंबेडकरांची विचारधारा आहे. आरएसएस विरोधातली माझी विचारधारा मी गेल्या 20 वर्षापासून सातत्याने मांडत आलो आहे. मी ती विरोधातली विचारधारा अजूनही सोडलेली नाही. तसेच आरएसएसची विचारधारा मरेपर्यंत स्विकारणार नाही, जिथे विरोध होता तिथे विरोध कायम राहणार असल्याचे अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ज्या अजित दादांनी मला संधी दिली.त्या अजित दादांनी कुठलीही भूमिका घेतली असेल,त्या भूमिकेला माझे समर्थन असल्याचे अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
हे ही वाचा : Pawar Family: अजितदादांच्या बंडानंतर पक्ष, पवार कुटुंबात फूट पण ‘इथे’ मात्र सगळे एकत्र!
राष्ट्रवादीचे सेक्युलरीझम संपली आहे का? असा सवाल साहिल जोशी यांनी केला होता. यावर अमोल मिटकरी म्हणाले की, माझी विचारधाराही शिव, शाहु, फुले, आंबेडकरांची विचारधारा आहे. आणि माझी विचारधारा मी सोडलेली नाही. त्या विचारधारेवर मी ठाम आहे. आणि तीच भूमिका मी शेवटच्या श्वासापर्यंत जपणार आहे, असा विश्वास अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला. तसेच अजित दादांनी देखील त्यांची विचारधारा सोडलेली, असे अमोल मिटकरी यांनी सांगितले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
मी भाजपसोबत गेलो नाही आहे. आमच्या राष्ट्रवादीची त्यांच्यासोबत युती आहे. त्यामुळे मी भाजपचा प्रचारक नाही आहे. भाजपच्या भविष्यात प्रचार करणार नाही,असे देखील अमोल मिटकरींनी स्पष्ट केले आहे.अजित दादांनी जो निर्णय़ घेतला त्या भुमिकेसोबत जाणे ही माझी नैतिक जबाबदारी समझतो,असे देखील अमोल मिटकरी यांनी सांगितले.
आरएसएसची विचारधारा मी मरेपर्यंत स्विकारणार नाही. जिथे विरोध होता, तो विरोध कायम राहणार आहे. तसेच ज्य़ा नेत्याने मला मोठं केलंय, मला दोन घास दिले आहेत, माझ्या दोन लेकरांना शिक्षण दिले. माझ्यासारख्या साधारण मुलाला आमदार केले, माझा राजकीय जन्म अजित दादांनी केला, त्यामुळे अजित दादांनी जी भूमिका घेतली आहे.त्या भूमिकेला माझे समर्थन असल्याचे अमोल मिटकरी यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मविआचं गणित इथेही बिघडलं, महायुतीचं पारडं जड; बंडाचा बसला असाही फटका
अजित दादांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चा सुरू होत्या, त्यावेळी भाजपसोबत जाण्याचे पाप करणार नाही, असे विधान अमोल मिटकरी यांनी केले होते. या विधानावर अमोल मिटकरी म्हणाले, पाप पुण्यच्या भानगडीत मी पडत नाही, पुरोगामी चळवळीतला माणूस आहे, त्यामुळे मी अजित दादांचे समर्थ करतो, अशी भूमिका मिटकरी यांनी मांडली. याचसोबत मिटकरी यांना विचाराधारा की दादा असा प्रश्न करण्यात आला होता. यावर दादा म्हणजेच विचारधारा असे अमोल मिटकरी यांनी स्पष्ट शब्दात सांगत अजित दादांनाच निवडणार, आताच्या घडीला दादांनी घेतलेल्या निर्णयावर आमचे समर्थन असल्याचेही अमोली मिटकरी यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT