Ajit Pawar मुळे राष्ट्रवादीत होणार भूकंप! 34 आमदारांकडून शरद पवारांची मनधरणी?
शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं भगदाड पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या मनस्थितीत असून, 30 ते 34 आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.
ADVERTISEMENT

शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं भगदाड पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या मनस्थितीत असून, 30 ते 34 आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. (ajit pawar will go with bjp and be part of the Shinde-Fadnavis govt, almost 30/34 MLAs supported him.)
सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वीच महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचे चिन्ह दिसू लागले आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून महाराष्ट्रात 2019 ची पुनरावृत्ती होण्याच्या चर्चेनं फेर धरला असून, आता सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवारांनी भाजपसोबत जाण्यासाठी पक्षात मोर्चेबांधणी केली आहे.
30 ते 34 आमदार अजित पवारांसोबत?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपसोबत आघाडी करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याची भूमिका अजित पवारांची आहे. त्यांच्या या भूमिकेला राष्ट्रवादीच्या 53 पैकी 30 ते 34 आमदारांचा पाठिंबा आहे.
यात राष्ट्रवादीतील महत्त्वाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांचाही अजित पवारांच्या भूमिकेला पाठिंबा आहे.










