Amol Mitkari : महायुतीत वादाची ठिणगी! मिटकरी CM शिंदेंच्या नेत्यावर भडकले

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

amol mitkari reply vijay shivtare on ajit pawar baramati lok sabha constituency supriya sule vs sunetra pawar
शिवतारे यांनी अजित पवारांकडून बदला घेण्याची भाषा करत लोकसभा निवडणुकीसाठी आव्हान दिलं आहे.
social share
google news

Amol Mitkari On Vijay Shivtare : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र तरी देखील बारामती लोकसभा मतदार संघावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे. या दाव्यानंतर शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले आहे. शिवतारे (Vijay Shivtare) यांनी अजित पवारांकडून बदला घेण्याची भाषा करत लोकसभा निवडणुकीसाठी आव्हान दिलं आहे. या आव्हानानंतर आता अमोल मिटकरी (Amol Mitkari) चांगलेच भडकले आहे. त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडल्याची चर्चा आहे.  (amol mitkari reply vijay shivtare on ajit pawar baramati lok sabha constituency supriya sule vs sunetra pawar) 

ADVERTISEMENT

खरं तर विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरूद्द दंड थोपटल्यानंतर अमोल मिटकरी चांगलेच संतापले आहेत. एकनाथ शिंदे साहेब शिवतारेंना आवरा. त्यांच्या बोलण्यात हलकटपणाचा कळस केलाय. महायुती सोबत राहुन जर दादांविरुद्ध बोलण्याचा उन्मत्तपणा कमी करित असतील तर आमचाही नाईलाज होईल, असा थेट इशाराच मिटकरींनी दिला आहे.

हे ही वाचा :PM मोदींविरोधात वाराणसीतून 1000 उमेदवार भरणार फॉर्म!

विजय शिवतारे काय म्हणाले होते? 

लोकसभेची निवडणूक समोर आहे, सुप्रिया ताई आणि सुनेत्रा ताई असं सर्व सुरु आहे. बारामती लोकसभा हा कुणाचा सातबारा नाही. बारामती लोकसभा मतदारसंघात पुरंदर,भोरचाही खासदार पाहिजे. आम्ही का म्हणून यांना 10-1O वेळा मतदान करायचं? आम्हाला काहीच मिळालं नाही, असे विजय शिवतारे म्हणाले होते. पवार कुटुंबाबाहेरचा बारामतीचा खासदार हवा आहे आणि मी 1 हजार टक्के आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची भूमिका शिवतारेंनी घेतली आहे. त्यामुळे अजित पवारांचं टेन्शन शिवतारेंनी वाढवलं आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा :Lok Sabha : राजकारणामुळे 10 वर्षांचं नातं तुटलं, नवरा-बायको निवडणुकीत आमने-सामने

दरम्यान 'तू निवडून कसा येतो बघतोच आता', असं म्हणत अजित पवारांनी विजय शिवतारेंना निवडणुकीत पाडलं होतं. पवारांनी केलेल्या या पराभवाची सल अजूनही शिवतारेंच्या मनात घर करून असल्याचे समोर आले. त्यामुळेच विजय शिवतारेंनी आता अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आली आहे, असे सांगत लोकसभा निवडणुकीसाठी आव्हान दिलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT