Mahayuti : "राजकारण सोडेन, पण...", शिंदेच्या नेत्याने वाढवले राणा-भाजपचे टेन्शन!
Mahayut Lok sabha 2024 : अमरावती लोकसभा मतदारसंघात काही राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अमरावती लोकसभा मतदारसंघ
शिवसेनेने केला मतदारसंघावर दावा
भाजप नवनीत राणांना उमेदवारी देणार
Anandrao Adsul Navneet Rana News : इंडिया आघाडीच्या विरोधात राजकीय बेरीज जळवण्याचे प्रयत्न सध्या भाजपकडून सुरू आहेत. पण, अनेक ठिकाणी भाजपसमोर आव्हाने निर्माण होताना दिसत आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याचे समोर आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ चांगलेच आक्रमक झाले आहेत आणि त्यामुळे नवनीत राणांबरोबरच भाजपचंही टेन्शन वाढलं आहे. (Shiv Sena Former MP Anandrao adsul get aggressive against navneet rana)
ADVERTISEMENT
महायुतीमध्ये सर्व काही व्यवस्थित असल्याचे दावे तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांकडून केले जात असले, तरी मतदारसंघातील राजकीय परिस्थिती विरोधाभासी आहे. अनेक ठिकाणी महायुतीतीलच स्थानिक नेत्यांमध्ये राजकीय ठिणग्या उडू लागल्या आहेत. यात एक मतदारसंघ आहे अमरावती लोकसभा.
नवनीत राणांमुळे आनंदराव अडसूळांची जागा धोक्यात
२०१९ मध्ये नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर खासदार म्हणून संसदेत पोहोचल्या. त्यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला. यावेळी आनंदराव अडसूळ या जागेवरून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, मात्र त्यांचा हिरमोड होणार असेच दिसत आहे.
हे वाचलं का?
हेही वाचा >> ओवेसींविरोधात भाजपने शोधला नवा चेहरा, कोण आहेत डॉ. लता?
अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे युतीमध्ये शिवसेनेकडे असणारा हा मतदारसंघ भाजपकडे जाईल, असेच मानले जात आहे. त्यामुळे आनंदराव अडसूळ यांना संधी मिळणार नाही. आणि याचमुळे अडसूळ यांनी टोकाची भूमिका घेतली आहे.
आनंदराव अडसूळ असं काय बोलले?
आनंदराव अडसूळ म्हणाले, "आठ निवडणुकांपासून अमरावती लोकसभा मतदारसंघ युतीत शिवसेनेकडेच राहिला आहे. भाजप शिवसेनेची युती आजही कायम आहे. अमरावती लोकसभेची जागा भाजपची कधीच नव्हती, ती आमचीच जागा आहे."
ADVERTISEMENT
अडसूळ असंही म्हणाले की, "खरी शिवसेना नाव, पक्ष चिन्ह सर्व आमच्याकडेच आहे. त्यामुळे आम्ही दावा सोडणार नाही. एकवेळ राजकारण सोडू पण नवनीत राणांचा प्रचार करणार नाही. तशी वेळच येणार नाही", असे म्हणत अडसूळांनी आपली खदखद व्यक्त केली.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> गडकरींऐवजी दुसरा उमेदवार? निरीक्षकांच्या प्रश्नाने चर्चांना उधाण
अडसूळांना उत्तर देताना नवनीत राणांनी मात्र सौम्य भूमिका घेतली. त्या म्हणाल्या की, "ते आमचे नेते आहेत. राजकारण सोडेन, पण राणांच्या प्रचाराला जाणार नाही, असं काही होणार नाही. ते आमच्यासोबत येतील. कारण ते ८० वर्षांचे आहेत, तरीही राजकारणात सक्रीय आहेत. ते माझ्या प्रचारासाठी जरूर येतील, असा विश्वास मला आहे."
माढा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कल्याण-डोंबिवलीसह राज्यातील अनेक लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीतील तिन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांमध्ये धुसफूस सुरू आहे. तिन्ही पक्षातील अनेकजण लोकसभा निवडणुकीची तयारी करत होते. पण, राजकीय समीकरण बदलल्याने महायुतीतील नाराजी समोर येऊ लागली आहे. त्यामुळे इतर मतदारसंघाप्रमाणेच अमरावतीतही भाजपचे टेन्शन शिवसेनेच्या नेत्यामुळे वाढले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT