‘एक मोदी, सब पे भारी’, CM शिंदेंची शिर्डीत मोदींसमोरच घोषणा, PM ही खुदकन हसले

ADVERTISEMENT

appreciation from chief minister eknath shinde ek modi sab pe bhari prime minister narendra modi shirdi visit
appreciation from chief minister eknath shinde ek modi sab pe bhari prime minister narendra modi shirdi visit
social share
google news

CM Eknath Shinde: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी (Ahmednagar, Shirdi) दौऱ्यावर आले असतानाच विकास कामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे कौतुक करत 2014, 2019 आणि आता 2024 मध्येही पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार असल्याचा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील जनताही तुमच्यासोबतच असून ती यापुढेही तुमच्यासोबतच राहणार असल्याचे मतही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.(appreciation from chief minister eknath shinde ek modi sab pe bhari prime minister narendra modi shirdi visit)

मुख्यमंत्र्यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करतान त्यांनी एक मोदी सब पे भारी म्हणत त्यांच्या हाताला परीस असल्यामुळेच प्रत्येक गोष्टीचे सोने होते अशा शब्दात त्यांनी त्यांचा गौरव केला आहे. त्यांच्या या कौतुकामुळेच नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले होते.

हे ही वाचा >> बँक मॅनेजर हत्याकांड: भावासाठी करणार होता ‘ती’ गोष्ट, पत्नीने जीवच घेतला!

हजारो हेक्टर शेती ओलिताखाली

पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या ज्या गोष्टीला हात लावतात त्या-त्या गोष्टींना यश मिळते. त्यामुळेच आज त्यांच्या उपस्थितीत आज विकास कामांचे उद्घाट करुन 35 सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. या सिंचन प्रकल्पामुळे हजारो हेक्टर जमिनही ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याचा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

देशाचा गतीने विकास

नरेंद्र मोदी यांचे सरकार येण्याआधी देशातील विकास कसा होत होता. हे साऱ्या जनतेला माहिती आहे. मात्र आता नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देश आणि राज्याचा विकास गतीने होते आहे. म्हणूनच एक मोदी सब पे भारी म्हणत त्यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक घटकांसाठी काम केले आहे. युवकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, शेतकऱ्यांपासून ते अगदी महिला सक्षमीकरणासाठी नव नव्या योजना आणून देशाच्या विकासाला चालना दिल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हे ही वाचा >> PM मोदींचा अजित दादांसमोरच शरद पवारांवर निशाणा, काय म्हणाले?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT