Aurangabad: ‘आम्ही अर्धवट काहीच ठेवत नाही’, देवेंद्र फडणवीसांनी मारला टोमणा
Devendra Fadnavis severely criticized Amabadas Danve: मुंबई: औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांच्या नामांतराचा प्रस्ताव काल (24 फेब्रुवारी) केंद्र सरकारने मंजूर केला. त्यामुळे यापुढे औरंगाबाद (Aurangabad) शहर हे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) म्हणून ओळखलं जाणार आहे. तर उस्मानाबाद शहर धाराशिव म्हणून ओळखलं जाणार आहे. मात्र, असं असलं तरीही या जिल्ह्यांची नाव मात्र बदलली गेली नसल्याचं […]
ADVERTISEMENT
Devendra Fadnavis severely criticized Amabadas Danve: मुंबई: औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांच्या नामांतराचा प्रस्ताव काल (24 फेब्रुवारी) केंद्र सरकारने मंजूर केला. त्यामुळे यापुढे औरंगाबाद (Aurangabad) शहर हे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) म्हणून ओळखलं जाणार आहे. तर उस्मानाबाद शहर धाराशिव म्हणून ओळखलं जाणार आहे. मात्र, असं असलं तरीही या जिल्ह्यांची नाव मात्र बदलली गेली नसल्याचं विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते आणि शिवसेना (UBT) पक्षाचे अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी म्हटलं आहे. यावरून त्यांनी भाजपवर टीकाही केली आहे. पण त्यांच्या याच टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तात्काळ प्रत्युत्तर दिलं आहे. (aurangabad issue we leave nothing in half why devendra fadnavis was taunted like this)
ADVERTISEMENT
अंबादास दानवेंनी साधला निशाणा..
‘संभाजीनगरचं जे नामांतर झालं आहे. त्यासाठी आम्ही केंद्र आणि राज्य सरकारचं अभिनंदन केलं आहे. पण जो आदेश निघालेला आहे संभाजीनगर नामकरणाचा.. तो जर नीट पाहिलं तर त्यात असं आढळून येतं की, फक्त औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं आहे आणि जिल्हा औरंगाबाद असं म्हटलं आहे. याचा अर्थ असा प्रतीत होतो की, फक्त शहराचं नाव संभाजीनगर केलेलं आहे आणि जिल्ह्याचं नाव औरंगाबादच आहे. मग तालुक्याचं नाव काय आहे?’
‘म्हणजे तालुकाही औरंगाबाद, जिल्हाही औरंगाबाद आणि शहराचं नाव संभाजीनगर. म्हणून हे सगळं अनाकलनीय आहे. म्हणून हे जाणीवपूर्वक झालंय की चुकीनं झालं हे मला माहिती नाही. पण मी या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही कानावर हा विषय घातला आहे. परंतु आताच्या घडीला जे पत्रक निघालं आहे त्याच्या आधारे असं म्हणने की, फक्त ही धूळफेक करण्याचा प्रकार आहे की काय?’
हे वाचलं का?
‘संपूर्ण औरंगाबाद हे नावच नसावं. मग ते जिल्हा असो, शहर असो किंवा तालुका.. सगळ्याला नाव हे संभाजीनगरच असावं. अशी मागणी जनतेची आहे.’ असं म्हणत अंबादास दानवेंनी राज्य सरकारला या मुद्द्यावरून घेरण्याचा प्रयत्न केला.
मोठी बातमी: Aurangabad शहराचं नाव यापुढे छत्रपती संभाजीनगर, केंद्र सरकारची मंजुरी
ADVERTISEMENT
फडणवीस म्हणाले, आम्ही अर्धवट काहीच करत नाही…
दरम्यान, अंबादास दानवेंनी उपस्थित केलेल्या या प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून तात्काळ प्रत्युतर दिलं आहे. पाहा त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
‘अंबादास जी, आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या. केंद्र सरकारची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की, आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते, तेव्हा शहरांची नावे बदलतात. ही अधिसूचना जारी झाली आहे, त्यानुसार औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण झाले आहे.’
‘त्यानंतर महसूल व वन विभाग तसेच नगर विकास विभाग अधिसूचना जारी करेल, तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचे, तालुक्याचे, महापालिका आणि नगरपालिकेचे सुद्धा नाव बदलेल. दोन्ही जिल्ह्यांसंदर्भात याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा ते पूर्णच करतो. अर्धवट काहीच ठेवत नाही!’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
अंबादास जी,
आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या. केंद्र सरकारची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की, आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते, तेव्हा शहरांची नावे बदलतात. ही अधिसूचना जारी झाली आहे, त्यानुसार औरंगाबादचे 'छत्रपती संभाजीनगर' आणि उस्मानाबादचे 'धाराशिव' असे नामकरण झाले आहे. https://t.co/DyWaqjXlvO— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 24, 2023
Aurangabad आणि उस्मानाबाद ही नावं लावावीच लागणार, कसं ते समजून घ्या!
शिंदे-फडणवीस सरकारने नामांतराचा फेरप्रस्ताव केलेला सादर
औरंगाबाद, उस्मानाबाद शहराच्या नामांतरांबाबत ठाकरे सरकारने घाईने निर्णय घेतले होते. 29 जूनला राज्यपालांनी बहुमत चाचणी घ्यायला सांगितलेली असताना आणि सरकार अल्पमतात असताना हे निर्णय घेतले गेले. त्यावर काही कायदेशीर बाबी निर्माण होऊ नयेत म्हणून फेरप्रस्ताव सादर करण्याचे आदेश आम्ही देण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 16 जुलै 2022 रोजी सांगितलं होतं.
त्यावेळी एकनाथ शिंदे असं म्हणालेले की, ‘नामांतराबाबतच्या फेरप्रस्तावांना रितसर बहुमत असलेल्या सरकारने मान्यता दिली. त्यानुसार औरंगाबाद शहराला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव, उस्माबादला धाराशिव हे नाव तर नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.’ असं एकनाथ शिंदे त्यावेळी म्हणाले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT