Baba Siddique : सलमान खान नाही...'या' कारणासाठी झाली सिद्दीकींची हत्या, Inside Story

मुंबई तक

Baba Siddique Death Case Update : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणात आता नवीन नवीन खुलासे समोर येत आहे. त्यात आता एक मोठा खुलासा समोर आला आहे. सलमान खान आधीच बिश्नाई गँगच्या टार्गेटवर होता. त्यामुळे सलमानच्या जवळीकतेमुळे बाबा सिद्दीकींचा गेम झाल्याचं बोललं जातयं. पण सलमान तर फक्त मोहरा आहे, या हत्येमागचं मुळ कारण वेगळचं आहे.

ADVERTISEMENT

बाबा सिद्दीकींच्या हत्येची Inside Story
baba siddique case inside story gangster lawrence bishnoi mumbai police salman khan bollywood actor
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सलमान खान फक्त निमित्त

point

या कारणासाठी झाली सिद्दीकींची हत्या

point

लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात आहे का?

Baba Siddique Death Case Update : सौरभ वक्तानिया/ दिपेश त्रिपाठी/ मुस्तफा शेख मुंबई :  राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणात आता नवीन नवीन खुलासे समोर येत आहे. त्यात आता एक मोठा खुलासा समोर आला आहे. सलमान खान आधीच बिश्नाई गँगच्या टार्गेटवर होता. त्यामुळे सलमानच्या जवळीकतेमुळे बाबा सिद्दीकींचा गेम झाल्याचं बोललं जातयं. पण सलमान तर फक्त मोहरा आहे, या हत्येमागचं मुळ कारण वेगळचं आहे. ते कारण म्हणजे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला मायानगरी मुंबईवर राज्य करायचं आहे. मुंबईवर त्याला कंट्रोल हवाय, अशी माहिती मुंबई क्राईम ब्रांचच्या चार्जशीटमधून समोर आली आहे. (baba siddique case inside story gangster lawrence bishnoi mumbai police salman khan bollywood actor)

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने 14 जुलै 2024 ला मुंबईच्या मोक्का न्यायालयात 1736 पानी चार्जशीट दाखल केली होती. ही चार्जशीट सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर झालेल्या गोळीबार प्रकरणी होती. या चार्जशीटमध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईसह 9 जणांना आरोपी बनवलं होतं. याच चार्जशीटमध्ये एक मोठी माहिती देण्यात आली होती. सलमानला धमकी हे फक्त निमित्त आहे. वास्तविक लॉरेन्सला संपूर्ण मुंबईवर राज्य करायचे आहे. त्याला मुंबई अंडरवर्ल्डवर कंट्रोल हवाय. असं जरी असलं तरी बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर दोन प्रश्न 
उपस्थित होतायत. पहिलं म्हणजे, या हत्येमागे लॉरेन्स गँगचा हात आहे का?  आणि जर लॉरेन्स गँगचा हात असेल तर बाबा सिद्दीकी यांनाच का टार्गेट करण्यात आले?

हे ही वाचा : Baba Siddique Murder: बाबा सिद्दीकी हत्येबाबत प्रचंड मोठा खुलासा, नवी माहिती आली समोर...

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण 6 जणांची ओळख पटवली आहे. गुरमेल सिंग, शिवकुमार गौतम, धरमराज कश्यप, झिशान अख्तर, प्रवीण लोणकर आणि शुभम उर्फ शुबू लोणकर अशी त्यांची नावे आहेत. यापैकी गुरमेल सिंग, धर्मराज कश्यप आणि प्रवीण लोणकर हे तिघे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत, तर उर्वरित तिघे म्हणजे झिशान, शिवकुमार आणि शुभम फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

या अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीदरम्यान समोर आलेली कहाणी अशी आहे की, पंजाबमधील जालंधर येथील शकर गावचा रहिवासी असलेला झिशान अख्तर खून आणि दरोड्याच्या एका गुन्ह्यात पटियाला  तुरुंगात बंद होता. झिशानची स्वतःची एक टोळी आहे. तो 2022 ते जून 2024 पर्यंत पटियाला तुरुंगात होता. येथेच त्याची लॉरेन्स गँगच्या काही मेंबरशी भेट झाली. याशिवाय तुरुंगात असताना त्यांनी गुरमेल सिंग याचीही भेट घेतली होती. जो आपल्या मोठ्या भावाच्या हत्येप्रकरणी त्याच तुरूंगात शिक्षा भोगत होता. त्यानंतर 7 जून रोजी झिशान जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. याच दरम्यान, गुरमेलही जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. त्यानंतर झिशानने कैथल येथील गुरमेलच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर तो मुंबईत आला होता. 

हे वाचलं का?

    follow whatsapp