भाजपाचा ठाकरेंवर जोरदार हल्ला, 'ज्यांनी तुम्हाला भावासारखं प्रेम दिलं...'

योगेश पांडे

ADVERTISEMENT

तुम्ही आमचा विश्वासघात केला आहे. आता खोट्या शपथा घेऊन आई तुळजाभवानीचा अपमान करू नका,
bjp chandrashekhar bawankule criticize udhhav thackeray lok sabha seat sharing maharashtra politics
social share
google news

Chandrashekhar bawankule criticize Udhhav Thackeray : योगेश पांडे, नागपूर :  2019 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान अमित शाह खोटे बोलले होते,  तुळजाभवानी देवीची शपथ घेऊन सांगतो, असा दावा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता. ठाकरेंच्या या दाव्यावर आता भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही आमचा विश्वासघात केला आहे. आता खोट्या शपथा घेऊन आई तुळजाभवानीचा अपमान करू नका, असा निशाणा भाजपने ठाकरेंवर (Udhhav Thackeray)  साधला आहे.  (bjp chandrashekhar bawankule criticize udhhav thackeray lok sabha seat sharing maharashtra politics) 

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. बावनकुळे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. 

हे ही वाचा : "नाहीतर शिवसेनेची मते भाजप-राष्ट्रवादीला मिळणार नाही", शिंदेंनी शाहांना काय सांगितलं?

बावनकुळेंच ट्विट जसंच्या तसं

उद्धव ठाकरे , तुम्ही खोट्या शपथा घेऊन आई तुळजाभवानीचा अपमान करू नका. 

हे वाचलं का?

शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू म्हणतच वेळ येताच दगाबाजी करून अविचारी आघाडीच्या मांडीवर बसत मुख्यमंत्रीपद स्वतःच पटकावले. हा सामान्य शिवसैनिकांशी विश्वासघात नाही का? 

ज्यांनी तुम्हाला भावासारखे प्रेम दिले. त्यांचे तुम्ही फोन घेतले नाहीत. अबोला धरला. दगाबाजी केली. तुम्ही बारामती व दिल्लीसमोर कुर्निंसात करत होते.

ADVERTISEMENT

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची कशाला खोटी शपथ घेता. तुम्हीच दगाबाजी केली! होय, तुम्हीच!! निवडणूक प्रचाराच्या जाहीर सभा आदरणीय मोदीजी, आदरणीय अमित भाई घेत होते, तेंव्हाच हा खुलासा का केला नाही? 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : "शरद पवार आजपर्यंत हेच करत आलेत", राज ठाकरेंची फटकेबाजी

कारण, काँग्रेस आणि शरद पवार यांच्याशी तुमची गोपनीय चर्चा सुरु होत्या. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून होतो. आणि आता कुलस्वामिनीसमोर शपथ घेता?

आता तुमचे पद गेले, पक्ष गेला, निशाणी गेली, विश्वासू माणसेही गेली. हिंदुत्व नासवले,  स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानावर मूग गिळून बसले, सनातन धर्मावर मिंधे झाले. प्रभू श्रीराम प्रतिष्ठापनेत राजकारण आणले..हाती धुपाटणे आले म्हणून पुन्हा 'बंद खोलीतील' रडगाणे सुरु झाले.

तुम्ही आमचा विश्वासघात केला, आता किमान देवी देवतांचा विश्वासघात करू नका.
जय महाराष्ट्र

ठाकरेंचं नेमकं विधान काय? 

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने शब्द दिला होता. पण आता खोटे बोलत आहेत, असा दावा ठाकरेंनी केला होता. तुळजा भवानी देवीची शपथ घेऊन सांगतो की, अमित शाह खोटे बोलत आहेत. 2019 विधानसभा निवडणुकीवेळी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबतचा फॉर्म्युला ठरला होता, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला होता. 
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT