Raj Thackeray : "शरद पवार आजपर्यंत हेच करत आलेत", राज ठाकरेंची फटकेबाजी

मुंबई तक

Raj Thackeray Sharad Pawar News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर शरसंधान साधले. मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रवादीला लक्ष्य केले.

ADVERTISEMENT

राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापन दिनी शरद पवारांवरही निशाणा साधला.
शरद पवारांनी निवडून येणाऱ्या नेत्यांची मोळी बांधली अशी टीका राज ठाकरेंनी केली.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज ठाकरेंचे राजकीय मुद्द्यांवर भाष्य

point

मनसेच्या वर्धापन दिनी भाजपसह सगळ्यांवर साधला निशाणा

point

शरद पवारांच्या राष्ट्रवादीवरही टीका

Raj Thackeray Speech in Marathi : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडून येणाऱ्या नेत्यांची मोळी, म्हणत शरद पवारांवर टीकास्त्र डागले. (Raj Thackeray attacks on Sharad Pawar)

मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी राजकीय फटकेबाजी केली. ते म्हणाले, "मला माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत. कारण सध्या महाराष्ट्रात दुसऱ्याची पोरं कडेवर घेऊन फिरण्यात जो आनंद मिळतोय, ते तसलं सुख नकोय मला. माझ्या आहे ताकद तेवढी.

राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नाही" -राज ठाकरे

राज ठाकरे पुढे म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आधी दहा वर्ष आधी आला, पण त्याला मी पक्ष नाही म्हणणार. तो निवडून येणाऱ्या माणसांची बांधलेली मोळी आहे. शरद पवार हेच करत आले आहेत आजपर्यंत. जे जे निवडून येतात, त्यांना बरोबर घेतात. त्यांची एक मोळी बांधतात आणि सांगतात हा माझा पक्ष. ते वेगळे झाले तरी ते निवडून येणार आहेत. आता तर झालेच", असे म्हणत राज ठाकरेंनी शरद पवारांना लक्ष्य केले.  

हेही वाचा >> "नाहीतर शिवसेनेची मते भाजपला मिळणार नाही", शिंदेंनी शाहांना काय सांगितलं?

"या महाराष्ट्रात खऱ्या कुठले पक्ष स्थापन झाले असतील, तर एक पहिला जनसंघ, त्यानंतर शिवसेना आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना. याच्यातील ९९ टक्के लोकांचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता", असे राज ठाकरे यावेळी म्हणाले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp