Mahayuti : "नाहीतर शिवसेनेची मते भाजपला मिळणार नाही", शिंदेंनी शाहांना काय सांगितलं?
Mahayuti Seats Sharing Meeting updates : महायुतीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला हक्काच्या जागा देण्याची मागणी केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दिल्लीतील महायुतीच्या बैठकीत काय झाली चर्चा?
एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
महायुतीच्या जागावाटपाबद्दल बैठकीत झाली चर्चा
Mahayuti Lok Sabha Seat Sharing : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात महायुतीच्या नेत्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घरी बैठक झाली. मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या या बैठकीत जागावाटपाबरोबर इतर मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेता एकनाथ शिंदे यांनी एका मुद्द्यांकडे अमित शाह यांचं लक्ष वेधलं.
महायुतीच्या जागावाटपाबद्दल अजूनही ठरलं नाही. मुंबईत चर्चा झाल्यानंतर दिल्लीत अमित शाह यांच्या घरी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
राष्ट्रवादी-शिवसेना किती जागा?
या बैठकीत जागावाटपाबद्दल चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप 30 जागा लढवण्याच्या तयारीत आहे. तर शिवसेनेला 10 ते 12 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 6 ते 8 जागा देण्याबद्दल चर्चा झाली. मात्र, अंतिम निर्णय झाला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा 11 मार्च रोजी बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीलाही अमित शाह, जेपी नड्डा, मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल पटेल उपस्थित असणार आहेत.
हेही वाचा >> अजित पवार रोहित पवारांमधील संघर्ष टोकाला, जुन्या जखमेवर ठेवलं बोट
मतांबद्दल काय झालं बोलणं?
या बैठकीत मतदारसंघनिहाय चर्चा झाली. प्रत्येक मतदारसंघाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी अमित शाह यांनी मित्रपक्षांच्या नेत्यांना सांगितलं की, जिंकून येणं हाच उमेदवारीचा निकष असेल. त्याचबरोबर एकमेकांची मते मित्रपक्षांना मिळतील, यासाठी व्यवस्थित जागावाटप व्हायला हवे, असेही त्यांनी सांगितलं.










