Rohit Pawar : अजित पवार रोहित पवारांमधील संघर्ष टोकाला, जुन्या जखमेवर ठेवलं बोट

मुंबई तक

ADVERTISEMENT

रोहित पवारांनी अजित पवारांचे जुने प्रकरण पुन्हा उकरून काढले आहे.
रोहित पवारांनी अजित पवारांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरच बोट ठेवलं आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रोहित पवारांची अजित पवारांवर टीका

point

ईडीने कन्नड सहकारी साखर कारखान्यावर केलेल्या कारवाईनंतर आक्रमक पवित्रा

point

रोहित पवारांची सोशल मीडियावर पोस्ट

Rohit Pawar Ajit Pawar : पवार कुटुंबातील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस चिघळत चालल्याचे दिसत आहे. बारामती अ‍ॅग्रो लिमिटेडच्या कन्नड साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने जप्त केल्यानंतर रोहित पवारांनी अजित पवारांच्या जुन्या जखमेची खपली काढली. त्यामुळे अजित पवार विरुद्ध पवार कुटुंब अशी राजकीय लढाई होताना दिसत आहे. (Rohit Pawar vs Ajit pawar Latest political news)

ADVERTISEMENT

सक्तवसुली संचालनालयाने कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या संपत्तीवर टाच आणल्यानंतर आमदार रोहित पवार आक्रमक झाल्याचे दिसत आहे. रोहित पवारांनी या कारवाईनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच लक्ष्य केले आहे. 

रोहित पवारांची अजित पवारांवर टीका

ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवारांनी काका अजित पवारांच्या वर्मावर बोट ठेवलं आहे. अजित पवारांवर भाजपच्या नेत्याकडून सिंचन घोटाळ्याचे आरोप केले गेले. त्याच जखमेची रोहित पवारांनी खपली काढली आहे. 

हे वाचलं का?

रोहित पवारांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, "युवा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर तळमळीतून एका ‘बच्चा’ने 800 किमीची पायी संघर्षयात्रा काढली त्यावेळी ‘यांनी काय संघर्ष केला’ अशी टीका काहींनी केली."

हेही वाचा >> शाहांच्या घरी ठरला जागावाटपाचा फॉर्म्युला, शिंदे-पवारांना किती जागा?

पुढे रोहित पवार म्हणतात, "त्यांना सांगायचंय की, बुलेट ट्रेनपेक्षाही अधिक वेगाने भूमिका बदलत द्वेष पसरवणाऱ्या ‘मित्रा’बरोबर जाऊन सत्तेचं संरक्षण घेतल्यानंतर तुम्हाला अशी टीका करायला सुचते, पण माझा संघर्ष जगजाहीर आहे आणि व्यवसाय कसा उभा केला हे सांगण्याचं धाडसही माझ्यात आहे.पण तुम्ही कोणता संघर्ष करुन आणि कोणत्या ‘धरणा’तून ‘सिंचन’ करुन साम्राज्य उभं केलं, हे सांगण्याची हिंमत तुमच्याच आहे का?", असे म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांना डिवचलं आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> राहुल गांधी 'या' मतदारसंघातून लढणार, 39 उमेदवारांची पहिली यादी जाहीर 

"माझ्यावरील कारवाईवरून आज तुम्हाला व तुमच्या नवीन मित्राला गुदगुल्या होत असतील पण लोकसभा निवडणुकीत जनताच तुम्हाला वाकुल्या दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्याची झलक आत्ताच जागावाटपातही दिसायला लागलीय… हव्या त्या मंत्रीपदासाठी आणि तिकीटासाठी तुम्ही शंभर दिल्लीवाऱ्या कराल, पण महाराष्ट्राच्या प्रश्नांवर कधी दिल्लीत आवाज उठवलेला ऐकला नाही", असे म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांना घेरलं आहे.

ADVERTISEMENT

ईडीची कारवाई राजकीय सूडापोटी?

रोहित पवारांविरुद्ध सुरु असलेली ईडीची कारवाई राजकीय सूडापोटी असल्याचा आरोप विरोधी पक्षांच्या नेत्याकडून केला जात आहे. ज्या महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अजित पवारांना क्लीन चीट दिली आहे. त्यामुळे या कारवाईमागे राजकारण असल्याचे विरोधक म्हणत आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT