नाशिक : आपच्या उमेदवारावर विरोधी कार्यकर्त्याने बंदूक उगारली, पण स्थानिकांनी त्यालाच दिला चोप, पाहा व्हिडीओ
Nashik Crime News : सुदैवाने, प्रसंगावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत बंदूक उगारलेल्या व्यक्तीला पकडून चोप दिला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना प्रबुद्ध नगरमध्ये घडली. दरम्यान, ही बंदूक खरी आहे की नकली? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येतोय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नाशिक : आपच्या उमेदवारावर विरोधी कार्यकर्त्याने बंदूक उगारली,
पण स्थानिकांनी त्यालाच दिला चोप, पाहा व्हिडीओ
Nashik Crime News, नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमधील प्रभाग क्रमांक 11 मध्ये आम आदमी पक्षाच्या (आप) उमेदवार समाधान आहिरे यांच्यावर बंदूक उगारल्याची गंभीर घटना घडली असून, या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने, प्रसंगावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत बंदूक उगारलेल्या व्यक्तीला पकडून चोप दिला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना प्रबुद्ध नगरमध्ये घडली. दरम्यान, ही बंदूक खरी आहे की नकली? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येतोय.
या प्रकरणात महत्त्वाचा दावा समोर आला असून, बंदूक उगारलेला व्यक्ती हा प्रभागातील माजी नगरसेवक आणि सध्या कारागृहात असलेले प्रकाश लोंढे यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, निवडणुकीदरम्यान वाढणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले. मात्र, उपस्थित नागरिकांनी धाडस दाखवत तात्काळ त्या व्यक्तीला पकडले आणि त्याला चोप दिला.
हेही वाचा : एकनाथ शिंदे यांचा ठाकरे बंधूंना तिखट सवाल म्हणाले, 'ठाकरे बंधू आता का एकत्र आले? बाळासाहेब असताना...'
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जमावाच्या तावडीत सापडलेल्या आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडील बंदूक जप्त करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात बंदूक खऱ्या स्वरूपाची असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.










