‘उद्धव ठाकरेंना पुन्हा आरोग्यावरुन डिवचलं’, देवेंद्र फडणवीस म्हणाले; तुम्हाला तर..
उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना कलंक म्हटल्यापासून दोन्ही नेते एकमेकांवर शाब्दिक हल्ला चढवत आहेत. आता पुन्हा एकदा फडणवीसांनी ठाकरेंवर जहरी टीका केली आहे.
ADVERTISEMENT

Latest News Of Maharashtra Politics: मुंबई: शिवसेना (UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल (10 जुलै) उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली. ‘देवेंद्र फडणवीस हे नागपूरवर कलंक आहेत.’ अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये बोलताना केली होती. त्यावर फडणवीसांनी कालच आपल्या ट्विटर अकाउंटवरुन अनेक उदाहरणं देत उद्धव ठाकरेंना ‘कलंकिचा काविळ’ असं म्हणत पलटवार केला होता. ज्यानंतर उद्धव ठाकरेंनी आज (11 जुलै) पुन्हा पत्रकार परिषद घेत फडणवीस हे कलंकच असल्याचा पुनरुच्चार केला आहे. ज्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज असल्याचं म्हणत डिवचलं आहे. (bjp dcm devendra fadnavis criticized shiv sena ubt uddhav thackeray adversely affected needs psychiatrist news on maharashtra politics)
‘उद्धव ठाकरेंवर विपरित परिणाम झालाय, मानसोपचार तज्ज्ञांची गरज..’
‘उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर खरं म्हणजे मला या गोष्टीचं अत्यंत दु:ख आहे की, आमचे आजचे विरोधक आणि माजी मित्र उद्धव ठाकरे यांच्यावर आताच्या राजकीय परिस्थितीवर फारच विपरित परिणाम झालेला दिसतोय. त्यामुळे कदाचित त्यांना मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल अशी परिस्थिती याठिकाणी पाहायला मिळतं आहे. त्यामुळे असा मानसिकतेतून एखादा व्यक्ती बोलत असेल तर मला असं वाटतं की, त्यावर प्रतिक्रिया देणंही योग्य नाही. ही मानसिक स्थिती आहे ती सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. त्यावर प्रतिक्रिया न दिलेली बरी.’ अशा बोचऱ्या शब्दात फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांना डिवचलं!
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘त्याचं एवढं लागण्यासारखं काय, ज्यांना माझा शब्द लागला. त्यांना मला विचारायचं की, तुम्ही दुसऱ्यांवर भ्रष्टाचार आरोप करता तेव्हा तुम्ही कलंक लावत नाही का? तू भ्रष्ट आहेस, तुझं कुटुंब भ्रष्ट आहे, तो भ्रष्टाचाराचा कलंक तुम्ही लावत नाही का?’
‘हसन मुश्रीफांच्या पत्नीने रस्त्यावर येऊन आक्रोश केला होता. अशा धाडी टाकण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घालून ठार करा. मग तेच मुश्रीफ त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. आम्हाला जे बोलत होते की, बाळासाहेबांना अटक करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसला आहात. मला आज कळलं की यांनाही मांडी आहे. तुम्ही म्हणाल तो माणूस भ्रष्ट आणि तुम्ही त्याला मंत्रिमंडळात स्थानही देता. मग तो भ्रष्ट आहे की, देव आहे? तुम्ही म्हणाल तो भ्रष्ट आणि तुम्ही म्हणाल तो देव, हे कुठलं हिंदुत्व?’