Lok Sabha 2024 : शरद पवारांना बसणार झटका, जवळचा नेता भाजपच्या वाटेवर?

मुंबई तक

Maharashtra Politics Lok Sabha 2024 election Updates : महाराष्ट्रात आणखी राजकीय हादरा होणार. शरद पवारांच्या जवळचा नेता भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती.

ADVERTISEMENT

there is buzzing that Jayant patil may be join bjp
शरद पवार यांच्या जवळ असलेला एक नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, अशी चर्चा आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पश्चिम महाराष्ट्रातील शरद पवारांचा नेता भाजपच्या वाटेवर?

point

भाजप नेत्यांशी पक्ष प्रवेशाबद्दल चर्चा झाल्याची माहिती

point

लोकसभा निवडणुकीआधी बसणार धक्का?

BJP Sharad Pawar's NCP Leader : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पक्षात सामावून घेत भाजपने सगळ्यांना धक्का दिला. त्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील एक नेता भाजपच्या वाटेवर आहे. हा नेता शरद पवारांच्या जवळचा असून, भाजपकडून त्याला पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती समोर आली आहे. लोकमत वृत्तपत्राने सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. (There is buzzing that a big leader of Sharad Pawar's NCP is going to join the BJP.)

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी भाजपकडून विरोधी पक्षातील नेत्यांनाही पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातही अनेक नेते भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत, असे भाजपच्या नेत्यांकडून वारंवार सांगितले जात असताना आता शरद पवारांच्या जवळचा नेता भाजपच्या वाटेवर असल्याचे समोर आले आहे. 

शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यावर भाजपचं लक्ष्य

अशोक चव्हाण यांच्यानंतर राष्ट्रवादीतील हा नेता कोण, याबद्दलही चर्चा होत आहे. दिलेल्या वृत्तानुसार, भाजपने महाराष्ट्रातील 48 पैकी 42 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी काँग्रेस आणि शरद पवार (शरद पवार) यांच्या पक्षातील नेत्यांना पक्षात आणण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. 

शरद पवारांच्या जवळ असलेला हा नेता कोण?

वृत्तात म्हटलं आहे की, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. शरद पवारांच्या जवळचा हा नेता पक्षात आला, तर फायदा होईल, असे भाजपचे समीकरण आहे. हा नेता अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. अनेक महत्त्वाच्या खात्याचे मंत्रिपदही या नेत्याने सांभाळले आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp