Manish Sisodia : ठाकरेंच्या भेटीनंतर २४ तासांत केजरीवालांच्या सहकाऱ्याला अटक
The CBI has arrested Deputy Chief Minister Manish Sisodia : दिल्ली : उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना सीबीआयने (CBI) अटक केली आहे. कथित दारू घोटाळ्याप्रकरणात ८ तासांच्या चौकशीनंतर सीबीआयने ही कारवाई केली. दिल्ली सरकारनं आणलेल्या दारु धोरणात मनिष सिसोदियांनी सरकार ऐवजी व्यापाऱ्यांना फायदा मिळवून दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तपासा दरम्यान […]
ADVERTISEMENT

The CBI has arrested Deputy Chief Minister Manish Sisodia :
दिल्ली : उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना सीबीआयने (CBI) अटक केली आहे. कथित दारू घोटाळ्याप्रकरणात ८ तासांच्या चौकशीनंतर सीबीआयने ही कारवाई केली. दिल्ली सरकारनं आणलेल्या दारु धोरणात मनिष सिसोदियांनी सरकार ऐवजी व्यापाऱ्यांना फायदा मिळवून दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तपासा दरम्यान एका आयएएस अधिकाऱ्यानं मनीष सिसोदियांचे नाव घेतलं असल्याची माहिती आहे. चौकशीला जाण्यापूर्वीच मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी सिसोदिया यांच्या अटकेबाबत मोठा दावा केला होता. (CBI arrests Deputy CM Manish Sisodia in Delhi excise policy case)
चौकशीसाठी सीबीआय कार्यालयात जाण्यापूर्वी सिसोदिया यांनी आईचे आशीर्वाद घेतले होते. तसंच घरातून बाहेर पडताना सिसोदिया यांनी हसत हसत विजय चिन्ह दाखवले होते. त्यानंतर त्यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना अभिवादन केलं होतं. सिसोदिया यांच्यासाठी सीबीआयने विस्तृत प्रश्न संच तयार केला होता. तसंच सीबीआय मुख्यालयाभोवती पोलिसांनी कलम 144 लागू केलं होतं.
Narayan Rane म्हणाले पुण्यात येऊन बारा वाजवीन; अजितदादांनी 3 शब्दांत विषय संपवला