‘भाजप-शिवसेना युती तुटण्यामागे शरद पवारांची डील’; भुजबळांनी टाकला नवा ‘बॉम्ब’
शरद पवारांनी भाजपला शिवसेनेला सोडण्यास सांगितलं आणि आम्ही काँग्रेसला सोडतो असं सांगितलं. त्यामुळे 2014 मध्ये चारही पक्ष स्वबळावर लढले, असा नवा राजकीय बॉम्ब छगन भुजबळ यांनी टाकला.
ADVERTISEMENT
Chhagan Bhujbal vs Sharad Pawar : शरद पवारांना वाटतं, जे घडलंय ते माझ्यामुळे घडलं. पण, हे अजित पवारांनी केलं, असं म्हणत छगन भुजबळ यांनी शरद पवारांना घेरलं. 2014 मध्ये पडद्यामागे घडलेल्या घटना सांगत छगन भुजबळांनी गौप्यस्फोट केला. शरद पवारांनी भाजपला शिवसेनेला सोडण्यास सांगितलं आणि आम्ही काँग्रेसला सोडतो असं सांगितलं. त्यामुळे 2014 मध्ये चारही पक्ष स्वबळावर लढले, असा नवा राजकीय बॉम्ब छगन भुजबळ यांनी टाकला.
ADVERTISEMENT
भुजबळ म्हणाले, “शरद पवारांना असं वाटतं की, छगन भुजबळांनी हे सर्व घडवून आणलं. ही चुकीची कल्पना आहे. पवार साहेबांनाही हे माहिती आहे. 2014 मध्ये भाजपने निवडणुकीच्या वेळी शिवसेनेला सोडले. त्याच वेळी पवार साहेब कबूल झाले होते की, तुम्ही शिवसेनेला सोडलं की आम्ही काँग्रेसला सोडू आणि निवडणुकीनंतर काही महिन्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये सामील होईल. त्याप्रमाणे आपण पाहिलं की आम्ही काँग्रेसपासून दूर झालो आणि शिवसेनेलाही भाजपपासून दूर केले. सगळे स्वतंत्र लढले. त्याच्यानंतर आमदारांची कमी संख्या होती आणि आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी (शरद पवार) सांगितलं की, आमचा पाठिंबा कायम धरू नका आणि फडणवीस यांनी शिवसेनेचे काही मंत्री घेतले. या चर्चेत मी नव्हतो. पहिल्यापासून या चर्चा प्रफुल पटेल, अजित पवार, पवारसाहेब हीच मंडळी करत होती.”
शरद पवार मोदींसोबत ठरवून आले होते
“2017 मध्ये आम्ही तुरुंगात होतो. अजित पवार म्हणाले की, उद्योगपतीच्या घरी पाच मीटिंग झाल्या. खाती ठरली. मंत्री ठरले आणि परत त्यांनी सांगितले की, आम्ही भाजपबरोबर राहू पण, शिवसेनेला तुम्ही बाहेर काढा. म्हणजे परत शिवसेनेला बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला. भाजपने सांगितलं की आम्ही 25 वर्षांपासूनचा मित्र नाही सोडू शकत. तिथेही शिवसेनेला बाहेर काढण्याची मागणी केली. 2019 मध्येही मोदींबरोबर ठरवून आले की, निवडणुकीनंतर समझौता करायचा आणि सरकार भाजप-राष्ट्रवादीचं करायचं”, असा गौप्यस्फोट भुजबळ यांनी केला.
हे वाचलं का?
वाचा >> ‘तुम्ही 50 ठिकाणी माफी मागणार आहात का?’, छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
याच मुद्द्यावर छगन भुजबळ पुढे म्हणाले की, “अडीच अडीच वर्षावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचं भांडण झालं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही यांना सोडतोय. तुम्ही आमच्याबरोबर येणार ना? त्यांनी (भाजप) त्यांना (शिवसेना) सोडलं. शिवसेनेला यांच्या सांगण्यामुळे भाजपने शिवसेनेला सोडले. मी या कोणत्याही चर्चांमध्ये नव्हतो. शरद पवारांच्या सांगण्यावरून प्रफुल पटेल, अजित पवार आणि जयंतराव पाटील हेच होते. मला कधी पाठवलं नाही, मी कधी दिल्लीला गेलो नाही, त्या चर्चा करायला. मग तुम्हीच हे सगळं केले. मला दोष देऊन काय उपयोग आहे?”, असा सवाल करत भुजबळांनी शरद पवारांना घेरलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT