मराठा आरक्षण: ‘फडणवीसांना बोलू दिलं नाही’, ‘त्या’ बैठकीबाबत भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

रोहित गोळे

ADVERTISEMENT

chhagan bhujbal has revealed that devendra fadnavis was not allowed to speak in the all party meeting regarding maratha reservation
chhagan bhujbal has revealed that devendra fadnavis was not allowed to speak in the all party meeting regarding maratha reservation
social share
google news

Chhagan Bhujbal Maratha Reservation and Devendra Fadnavis: बीड: मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) देण्याच्या निर्णयावर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे फारच नाराज आहेत. सरकारचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा असून त्याचा परिणाम ओबीसींच्या आरक्षणावर होईल असं स्पष्ट विधान भुजबळांनी केला आहे. मात्र, यासोबतच भुजबळांनी मराठा आरक्षणासंबंधी काही दिवसांपूर्वीच झालेल्या सर्वपक्षीय बैठकीबाबत प्रचंड मोठा गौप्यस्फोट केला आहे. ज्यामुळे नव्या राजकारणाला आता सुरुवात झाली आहे. (chhagan bhujbal has revealed that devendra fadnavis was not allowed to speak in the all party meeting regarding maratha reservation)

ADVERTISEMENT

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे दुसऱ्यांदा उपोषण करत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी याबाबत तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. याच बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं होतं की, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्व पक्षांचं एकमत झालं आहे.

हे ही वाचा>> Maratha Reservation: शहाजी बापूंची गाडी अडवली, आमदार साहेब खाली उतरले, कानात कुजबुजले अन्…

मात्र, आता या बैठकीत नेमकं काय झालं याबाबत बोलताना आज (6 नोव्हेंबर) छगन भुजबळ यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. ‘सर्वपक्षीय बैठकीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलले नाहीत.. किंवा त्यांना बोलू दिलं नाही.. तसंच पवार साहेब देखील बोलले नाही. बैठकीत थेट ठराव वाचून दाखवला आणि बैठक संपली.’ असं खळबळजनक दावा भुजबळांनी केला आहे. ज्यामुळे आता उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे.

हे वाचलं का?

छगन भुजबळांचा खळबळजनक दावा

‘मराठा समाज आमचा मोठा भाऊ आहे हे नेहमीच म्हणतो. त्यांना आरक्षण द्या हेही म्हणतो. त्यांच्यासाठी लढायला देखील मी तयार आहे. जेव्हा-जेव्हा असे कायदे आले तेव्हा विधीमंडळात हात वर करणारा पहिला हा छगन भुजबळ होता. विचारा सभागृहातील लोकांना.. मी ज्या मतदारसंघातून आलो.. तिथे मी भेदभाव केला नाही.’

‘मी या संदर्भात मी जी सर्वपक्षीय सभा झाली ज्यामध्ये पवार साहेब होते.. जिथे सर्व पक्षाचे नेते होते.. काँग्रेस होती.. की, हे पोलीस हतबल का झाले, त्या दिवशी काय झालं..? हे सुद्धा सांगितलं गेलं पाहिजे.. दुर्दैवाने त्या वेळेला.. फडणवीस तेही बोलले नाहीत किंवा बोलू दिलं नाही.. पवार साहेबही बोलले नाहीत. आणि एकदम तो ठराव वाचून ती बैठक संपविण्यात आली.’

‘अरे खरं काय आहे ते येऊ द्या ना लोकांसमोर… तुम्ही पोलिसांना असं सोडलं तर ते तुमचं आमचं कसं काय संरक्षण करणार आहेत? हा तर विचार करा.. शेवटी पोलीसच तुमच्या-आमच्या संरक्षणाला येतात.’

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Shiv Sena : CM शिंदेंनी ठाकरेंना का दिलं नाही निमंत्रण? आमदाराने केला खुलासा

‘जरांगे असे म्हणाले होते की, जाळपोळ करणारी माणसं आमची नाहीत. ती सरकारची माणसं असतील. असं जर असेल तर तुम्ही त्यांचे गुन्हे मागे घ्या.. असं का सांगता? तुमची ती माणसं नाहीत तर गुन्हे मागे घ्या ही मागणी का करता? असंही जरांगे-पाटील म्हणाले होते.’ असं म्हणत छगन भुजबळ यांनी आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या विषयाला वेगळं वळण दिलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT