Chhagan Bhujbal : आधी सडकून टीका, अचानक शरद पवारांची घेतली भेट

मुंबई तक

ADVERTISEMENT

छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर टीका केली होती.
शरद पवार आणि छगन भुजबळ
social share
google news

बातम्या हायलाइट

point

छगन भुजबळांनी शरद पवारांवर केली होती टीका

point

सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन शरद पवारांची घेतली भेट

point

भुजबळांनी पवारांवर काय केली होती टीका?

Chhagan Bhujbal Sharad Pawar meeting : आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवार यांना लक्ष्य केल्यानंतर छगन भुजबळांनी आज अचानक सिव्हर ओक गाठलं. भुजबळ अचानक शरद पवारांची भेट घेण्यासाठी का गेले, याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. (chhagan Bhujbal Sharad Pawar meeting at Silver oak)

ADVERTISEMENT

महाविकास आघाडीने आरक्षणासंदर्भात बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकला होता. त्यावरून छगन भुजबळ यांनी शरद पवारांना जबाबदार धरले. शरद पवारांनी सामाजिक विषयात पुढाकार घ्यायला हवा, असेही ते म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे पाठीमागे राहून महाराष्ट्र पेटवण्याचा खेळ चालला आहे, असे विधान भुजबळ यांनी केले. 

छगन भुजबळ सिल्व्हर ओकवर 

शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिव्हर ओक येथे छगन भुजबळ सोमवारी (१५ जुलै) सकाळी ११ वाजता पोहोचले. वेळ न घेताच भुजबळ भेटीला गेले. त्यामुळे त्यांना प्रतिक्षा करावी लागली. छगन भुजबळांनी आधी टीका केली आणि नंतर अचानक भेटीला का गेले? या प्रश्नाभोवती आता चर्चा सुरू झाली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा >> "क्रॉस व्होटिंगमध्ये माझे नाव आल्याचे पाहिले अन्...", आमदार चौधरींनी सोडलं मौन 

छगन भुजबळांनी काय केले आहेत आरोप?

"ज्यावेळी आरक्षणाच्या बाबतीत काही प्रश्न निर्माण होतात, त्यावेळी  अपेक्षा ही आहे की, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवारांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होते. परंतू असं सांगितलं जातं की, सगळे येणार होते, पण पाच वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणाऱ्या नेत्यांनी बहिष्कार टाकला", असे छगन भुजबळ बारामतीत बोलताना म्हणाले होते.

हेही वाचा >> आव्हाड भुजबळांना म्हणाले, "तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा दिला असता तर..."

"तुमचा राग आमच्यावर असेल, तुमचा राग अजितदादावर असेल, तुमचा राग छगन भुजबळवर असेल, पण या ओबीसी समाजाने तुमचं काय घोडं मारलं आहे? का तुम्ही येत नाही? का हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर येत नाही? सगळ्यांना सांगायचं आणि मग पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि त्यातून हे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चालले आहेत", असे गंभीर विधान भुजबळांनी शरद पवारांच्या नावाचा उल्लेख न करता केले. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT