Bhujbal Vs Damania : घर लाटल्याच्या दमानियांच्या आरोपांवर भुजबळांचं उत्तर, फर्नांडिस प्रकरण नेमकं काय?

मुंबई तक

मंत्री छगन भुजबळ यांचे भाषण ऐकले आणि तळपायाची आग मस्तकात गेली असं म्हणते भुजबळ कुटुंबीयांवर त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आम्ही आमच्या कष्टाचं खातो असं म्हणणाऱ्या छगन भुजबळ यांनी फर्नांडिस यांचे घर लाटल्याचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी पेटला आहे.

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Bhujbal-Damaniya: राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा सध्या जोरदार दौरा सुरु आहे. त्यातच मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्वाखाली ओबीसींच्या एल्गार (OBC Elgar Sabha) सभेच जरांगे पाटील यांच्यावर त्यांनी जोरदार निशाणा साधला होता. त्यावेळी त्यांनी भाषण करताना आम्ही कोणाचंही लाटलेलं काही खात नसल्याचे आपल्या भाषणातून त्यांनी सांगितले होते. त्यांच्या त्या भाषणानंतर अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी पत्रकार परिषदे घेऊन छगन भुजबळ यांच्यासह त्यांनी त्याच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे भुजबळ आणि दमानिया हा वाद आता आणखी पेटला आहे.

हे ही वाचा >>Ind vs Aus World Cup Final LIVE : वर्ल्ड कप फायनलसाठी PM मोदींच्या भारतीय संघाला शुभेच्छा

तळपायाची आग मस्तकात

अंजली दमानिया म्हणाल्या की, मी छगन भुजबळ यांचे एक प्रक्षोभक भाषण ऐकले. आणि खरच सांगते की, डोक्यात तिडीक गेली.म्हणजे तळपायाची आग मस्तकात गेली तशी तळपायाची आग अक्षरशः मस्तकात गेली, आणि काल जे काय म्हणाले की, आम्ही आमच्या कष्टाचं खातो. कुठल्या कष्टाचं खातो. त्याचा खुलासा करण्यासाठी आज मी त्यांच्या घराच्या इथे, मी फक्त दाखवणार होते, हे त्यांचे घर आहे, मात्र हे त्यांचं घर आहे, जे घर लुटलेले आहे. त्यांचा एक बंगला होता. मात्र तो बंगला रिडेव्हलपमेंटसाठी रहेजाला देऊन टाकला. त्यामध्ये त्यांना पाच फ्लॅट मिळणार होते. ते पाच फ्लॅट फर्नांडिस यांना मिळाले नाहीत असा त्यांनी छगन भुजबळ यांच्या कुटुंबीयांवर त्यांनी गंभीर आरोप केला होता.

मी बोलणार नाही

त्यांच्या त्या आरोपानंतर छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्याकडून स्पष्टीकरण देत त्यांनी सांगितले की, आम्ही कोणाचं घर लाटलं नाही, आणि ज्याबद्दल दमानिया बोलत आहेत. ते प्रकरण न्यायप्रविष्ठ असून त्याबद्दल मी काही बोलणार नसल्याचेही छगन भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंत आता समीर भुजबळ यांनीही आपली बाजू मांडून याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

समीर भुजबळांचे स्पष्टीकरण

समीर भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, सांताक्रूझ येथील आमच्या निवासस्थानाच्या जागेबाबत अनेक गैरसमज पसरविले जात आहेत. मात्र वस्तुस्थितीत वेगळी आहे. ही जागा ही बॉमबे ख्रिश्चन ट्रस्टच्या मालकीची असून फ्रान्सिस फर्नांडिस हे लिझ होल्डर म्हणजे मालक होते. यांनी त्यांच्या मुलीला लिझचे हक्क श्रीमती शैला यांना दिले होते. म्हणजेच त्या या जागेच्या खऱ्या मालक होत्या व त्यांनी सदर जागेसंबंधी हक्क त्यांचे भाऊ श्री व सौ फर्नांडिस यांना दिले होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp