Shiv Sena: ‘या’ एका घटनेनंतर तुफान राडा.. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर काय घडलं?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Balasaheb memorial shivsena shinde Group and Thackeray Group riot : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीथळाला आज भेट देऊन आदरांजली वाहिली. यानंतर मुख्यमंत्री शिंदे स्मृतीथळावरून निघून गेल्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांचे स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान शिंदे गटाने अनेक कार्यकर्ते स्मृतीस्थळी उपस्थित होते. त्यामुळेच ठाकरे आणि शिंदे गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली. (cm eknath shive visit balasaheb memorial shivaji park dadar shinde group and thackeray group riot maharashtra politics)

ADVERTISEMENT

उद्या 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांचा 10 वा स्मृतीदिन आहे. या स्मृतीदिनाच्या एक दिवस आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीथळाला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी बाळासाहेबांना अभिवादन करून त्यांना आदरांजली दिली. यानंतर मुख्यमंत्री शिंदे निघून गेले होते. यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि अनिल देसाई यांच्या नेतृत्वात हे कार्यकर्ते शिवाजी पार्कवर दाखल झाले. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ ठाकरे गटाकडून गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण् करण्याचा प्रयत्न झाला. ठाकरे गटाचा हा प्रयत्न शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून हाणून पाडण्याचाही प्रयत्न झाला. या प्रयत्नात बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यामध्ये जोरदार राडा झाला.

हे वाचलं का?

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळासमोरच दोन्ही गट भिडले होते. यावेळी दोन्ही गट एकमेकांना धक्काबुक्की करत होते. या दरम्यान स्मृतीस्थळाचे रॉडही तुटले गेले. दोन्ही गट एकमेंकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत होते. हाकलून द्या, हाकलून द्या, गद्दारांना हाकलून द्या, अशा घोषणा ठाकरे गट करत होता. यावेळी शिवाजी पार्कवर तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी कोणताही वाद नको, गालबोट लागायला नको म्हणून सामंजसपणाची भूमीका घेत मुख्यमंत्री पूर्वसंध्येला दर्शन घ्यायला जातात. त्यामुळे आज ठाकरे गटाने तिथे दाखल होऊन वाद घालण्याची कोणतीही गरज नव्हती.परंतु, बाळासाहेबांना आपण गमावलंय या भीतीपोटी ते कोणत्याही थराला जात आहेत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

मुख्यमंत्र्यांना अभिवादन करण्याचा अधिकार नाही

या सर्व घडामोडींवर आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीव्ही 9 ला प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत अंबादास दानवे म्हणाले, ज्यांनी शिवसेनेच्या विचाराची गद्दारी केली आहे. शिवसेना फोडण्याचे ज्यांनी पाप केले आहे. शिवसेना प्रमुखाची शिवसेना दिल्लीच्या बादशाच्या दरबारी नेऊन ठेवली आहे. त्यांना स्मृतीस्थळाला अभिवादन करण्याचा अधिकार नाही आहे. ही त्यांची नौटकी आणि नाटकबाजी असल्याची टीका दानवे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली. तसेच हा पुर्वनियोजित राडा नव्हता आणि आमच्याकडून व्हायचं काही कारण नाही. यांनीच मुद्दाम काही केले असेल म्हणून कार्यकर्ते चवथाळल्याचे आरोप अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT