उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीवर शिक्कामोर्तब! काँग्रेस किती जागा लढवणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

congress and samajwadi party alliance
congress and samajwadi party alliance
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उत्तर प्रदेशात ठरलं, काँग्रेस-सपाकडून जागांची झाली घोषणा

point

उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीवर शिक्कामोर्तब

Lok sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टी (Samajwadi Party) आणि काँग्रेस (Congress) यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी बुधवारी संध्याकाळी एकत्र निवडणूक लढवण्याची औपचारिक घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) काँग्रेसकडून 80 पैकी 17 जागांवर निवडणूक लढविली जाणार असून समाजावादी पार्टी आणि त्यांचे मित्रपक्ष इतर 63 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

ADVERTISEMENT

कोण? कुठे लढणार?

काँग्रेसने मध्यप्रदेशातही सपाला एक जागा दिली आहे. मध्य प्रदेशातील खजुराहो मतदारसंघातून सपाला जागा सोडण्यात येणार आहे. तर यूपीमध्ये सपाने आपली एक जागा आझाद समाज पक्षाला दिली आहे. नगीना जागेवर त्यांचे नेते चंद्रशेखर आझाद हे लढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सपाने रायबरेली, अमेठी, कानपूर नगर, फतेहपूर सिक्री, बांसगाव, सहारनपूर, प्रयागराज, महाराजगंज, वाराणसी, अमरोहा, झाशी, बुलंदशहर, गाझियाबाद, मथुरा, सीतापूर, बाराबंकी, देवरिया या जागा काँग्रेसला सोडल्या आहेत. 

एकत्रित झाली घोषणा

समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी लखनऊमध्ये एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जागा वाटपाची घोषणा केली. काँग्रेसच्यावतीने प्रदेश प्रभारी अविनाश पांडे, प्रदेशाध्यक्ष अजय राय यावेळी उपस्थित होते. तर सपाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल आणि प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांच्या उपस्थितीत ही संयुक्तपणे घोषणा करण्यात आली आहे. 

हे वाचलं का?

काँग्रेस आणि सपाची युती

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर त्यांनी ही जागा वाटपाची घोषणा केली आहे.  त्यानंतर अखिलेश यादव यांनी आपली प्रतिक्रिया देत काँग्रेसची आणि सपाची युती होणार असल्याचे जाहीर केले.

राहुल गांधींच्या न्याय यात्रेत 'अखिलेश'

काँग्रेससाठी देण्यात आलेल्या जागांपैकी वाराणसी-अमरोहासह काही जागांवर समाजवादी पार्टीकडूनही आपले उमेदवार उभे केले आहेत. जागा वाटपांची घोषणा झाल्यामुळे आता समाजवादी पार्टीकडून आपले उमेदवार मागे घेणार असून काँग्रेसकडून नावं जाहीर केली जाणार आहेत. जागांबाबत घोषणा झाल्यानंतर आता सपा प्रमुख अखिलेश यादवही राहुल गांधी  यांच्या न्याय यात्रेत सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे.

ADVERTISEMENT

काँग्रेसच्या जागा: 

रायबरेली, अमेठी, कानपूर नगर, फतेहपूर सिक्री, बनसगाव, सहारनपूर, प्रयागराज, महाराजगंज,वाराणसी, अमरोहा, झाशी, बुलनशहर, गाझियाबाद, मथुरा, सीतापूर, बाराबंकी, देवरिया या जागांवर काँग्रेसचे उमेदवार असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> लग्न समारंभात सुपरडॉनचा गेम, आमीरच्या हत्येची INSIDE Story

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT