भाजपसोबत गेले अन् मंत्री झाले! राष्ट्रवादीच्या नेत्यांवर काय आहेत भ्रष्टाचाराचे आरोप?

मुंबई तक

ADVERTISEMENT

The 'Mahasangram' has started once again in the politics of Maharashtra. NCP chief Sharad Pawar's nephew Ajit Pawar has joined the BJP-Shiv Sena government.
The 'Mahasangram' has started once again in the politics of Maharashtra. NCP chief Sharad Pawar's nephew Ajit Pawar has joined the BJP-Shiv Sena government.
social share
google news

Maharashtra Political Crisis 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘महासंग्राम’ सुरू झाला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे अजित पवार हे भाजप-शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार सरकारमध्ये सहभागी होताच त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आणखी आठ नेतेही सरकारमध्ये सहभागी झाले आहेत आणि त्यांनी मंत्रीपदाची शपथही घेतली आहे. (Ajit pawar and other leader joined bjp, Know who is facing the investigation of which agencies?)

अजित पवारांसह सरकारमध्ये सामील झालेल्या नेत्यांमध्ये छगन भुजबळ यांचेही नाव आहे. याशिवाय दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, धर्मराव आत्राम, अनिल पाटील आहेत. एवढेच नाही तर राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ आणि राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हेही उपस्थित होते.

महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे 53 आमदार आणि 9 आमदार आहेत. अजित पवार यांना 40 आमदार आणि विधान परिषदेच्या 6 सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवारांच्या गटाकडून केला जात आहे. मात्र, त्यांच्याकडे 36 आमदारही नाहीत, असे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. पक्षांतर विरोधी कायद्याच्या कारवाईतून वाचण्यासाठी अजित पवारांना किमान 36 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अजित पवारांसह एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सामील झालेले राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्राच्या राजकारणात किती ताकदवान?

अजित पवारांसोबतचे 3 मंत्री ईडीच्या रडारवर

1) अजित पवार

अजित पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मोठे बंधू अनंतराव पवार यांचे पुत्र आहेत. ते बारामती मतदारसंघाचे आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार चार वर्षात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री बनले आहेत. 2019 मध्ये ते केवळ 80 तासांसाठी उपमुख्यमंत्री झाले होते. नंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते आणि आता पुन्हा उपमुख्यमंत्री झाले आहेत.

ADVERTISEMENT

प्रकरणं : अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने दिलेल्या कर्जात अनियमितता केल्याचा आरोप आहे. हा कर्ज घोटाळा 2005 ते 2010 पर्यंतचा आहे. त्यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार होते. आर्थिक गुन्हे शाखा (EOW) याचा तपास करत आहे.

ADVERTISEMENT

वाचा >> Maharashtra politics : अजित पवारांची NDA त एन्ट्री एकनाथ शिंदेंसाठी ‘बॅड न्यूज’!

ईडीने या वर्षी एप्रिलमध्ये (2023) आरोपपत्रही दाखल केले होते. मात्र, ईडीने अजित पवारांना अद्याप आरोपी बनवलेले नाही. याशिवाय अजित पवारांचे नाव सिंचन घोटाळ्यातही आहे.

2) छगन भुजबळ

भुजबळ हे नाशिकमधील येवला येथून आमदार आहेत. पाच वेळा आमदार असलेले भुजबळ माळी समाजातून येतात. ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीही राहिले आहेत. 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर ते पक्षाचे पहिले प्रदेशाध्यक्ष होते.

प्रकरणं : सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना 2006 मध्ये 100 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे कंत्राट देण्यात अनियमितता झाल्याचा आरोप आहे. ईडीने स्वतंत्रपणे मनी लाँड्रिंगचा गुन्हाही नोंदवला आहे. दोन वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता. मुंबई विद्यापीठातील भ्रष्टाचाराप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही गुन्हा दाखल केला होता.

वाचा >> NCP : अजित पवारांच्या बंडाची स्क्रिप्ट लिहिली गेली होती एप्रिलमध्येच?

3) हसन मुश्रीफ

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभेचे पाचवेळा आमदार आहेत. राष्ट्रवादीचा मोठा मुस्लिम चेहरा मानला जातो. राज्यात कामगार मंत्री राहिले आहेत.

प्रकरणं : सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना लिमिटेड आणि त्यांच्या कुटुंबाशी संबंधित कंपन्यांमधून मनी लाँडरिंग केल्याचा आणि अनियमितता केल्याचे आरोप आहेत. याप्रकरणी ईडीचे छापेही पडले आहेत. विशेष न्यायालयाने एप्रिलमध्ये त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला असला, तरी उच्च न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळाला होता. त्यांच्या तीन मुलांचे जामीन अर्ज न्यायालयात प्रलंबित आहेत.

राष्ट्रवादीच्या इतर 6 नेत्यांची ताकद किती?

दिलीप वळसे पाटील : पश्चिम महाराष्ट्रातील आंबेगाव मतदारसंघातून सातवेळा आमदार. ते शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जायचे. दिलीप पाटील हे शरद पवार यांचे सचिव राहिले आहेत. ते विधानसभेचे अध्यक्षही राहिले आहेत.

5) धनंजय मुंडे : बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार. ते पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. धनंजय मुंडे हे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत. ते अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात.

वाचा >> Ajit Pawar : भाजपने महाराष्ट्रात केला ‘करेक्ट कार्यक्रम’, एकाच दगडात मारले दोन पक्षी

6) आदिती तटकरे : रायगडचे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या त्या कन्या आहेत. 2019 मध्ये श्रीवर्धन मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाल्या. उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे सर्वाधिक खाती होती. शिंदे सरकारमध्ये त्या पहिल्या महिला मंत्री आहेत.

7) संजय बनसोडे : लातूर जिल्ह्यातील उदगीर मतदारसंघाचे आमदार. ते पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. संजय भानसोडे हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात.

8) धर्मराव आत्राम : ते आदिवासी समाजाचे मोठे नेते आहेत. ते गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदारसंघाचे आमदार आहेत.

9) अनिल पाटील : विधानसभेत राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद होते. ते जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

प्रफुल्ल पटेल यांचीही सुरू आहे चौकशी

राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल हेही अजित पवारांच्या बाजूने आहेत. राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्याला प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते. प्रफुल्ल पटेल हे शरद पवारांचे सर्वात विश्वासू सहकारी मानले जातात.

शरद पवारांनीच प्रफुल्ल पटेल यांना राजकारणात आणले, असे म्हटले जाते. 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून प्रफुल्ल पटेल हे राज्यापासून केंद्रापर्यंतच्या राजकारणात आहेत.

वाचा >> Pasmanda Muslim: ‘या’ मुस्लिम मतांवर BJP चा डोळा का? PM मोदींची रणनीती नेमकी काय?

आता प्रफुल्ल पटेल यांनाही मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते, असे मानले जात आहे. त्यांना केंद्रात मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे.

अजित पवारांप्रमाणेच प्रफुल्ल पटेलही ईडीच्या रडारवर आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी गँगस्टर इक्बाल मिर्ची याच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात ईडीने शेकडो कोटींहून अधिक किमतीची मालमत्ताही जप्त केली आहे.

प्रफुल्ल पटेल यांच्याविरुद्ध विमान वाहतूक घोटाळ्याप्रकरणीही चौकशी सुरू आहे. ईडीने प्रफुल्ल पटेल आणि इक्बाल मिर्ची यांच्यातील कथित संबंधांबाबतही चौकशी केली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT