Ashok Chavan: 'कुणी जाण्यानं पक्ष संपत नसतो', चव्हाणांच्या पक्षांतर थोरातांची मोठी प्रतिक्रिया

मुंबई तक

ADVERTISEMENT

Ashok chavan Balasaheb thorat
Ashok chavan Balasaheb thorat
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कुणी जाण्यानं पक्ष संपत नसतो

point

देश नेमकं कुठं चालला आहे त्याचा विचार करा

point

संविधानिक विचार सोडन प्रतिगामी विचाराकडे

Balasaheb Thorat: 'महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण (Former CM Shankararao Chavan) यांचे सुपुत्र जे दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले, पंधरा वर्षे मंत्री राहिले,ज्यांच्या घरात काँग्रेसचे विचारसरणी रुजली त्यांनी काँग्रेस सोडून विरोधात असणारी विचारशैली स्वीकारून अशोक चव्हाण (Ashok Chavan) भाजपमध्ये कसा काय प्रवेश करू शकतात केला हाच मोठा प्रश्न आहे असं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी उपस्थित केला आहे. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अशोक चव्हाण यांनी काँग्रेस (Congress) का सोडली याविषयी त्यांनी विस्ताराने बोलत जनमत हे भाजपच्या बाजून नसून ते काँग्रेसच्या बाजूने असल्याचेही त्यांनी सांगितले.'

ADVERTISEMENT

काँग्रेसने सगळं दिलं

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखती सांगितले की, 'अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र त्यांनी तो निर्णय का घेतला आहे त्याची पूर्ण माहिती मला नाही. मात्र ज्या काँग्रेसने त्यांना सगळं दिलं तरीही त्यांनी असा निर्णय घेणं म्हणजे त्या पाठीमागे काही तरी धाक किंवा कोणतीतरी दहशत तरी हवी असं स्पष्ट मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.'

हे ही वाचा >> Ashok Chavan : आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागलं टीकास्त्र

दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव

काँग्रेसचा विचार आणि राजकारण म्हणजे संविधानिक विचार आहे. काँग्रेसमध्ये गटबाजी नाही असं नाही मात्र येथे स्वतंत्र विचार आपण करू शकतो. काँग्रेस म्हणजे समानतेचा विचार आहे. एकाच विचारधारा घेऊन पुढं जाण्याची विचारशैली काँग्रेसमध्ये नाही मात्र आता अशोक चव्हाण हे ज्या भाजपमध्ये सहभागी झाले आहेत. त्या भाजपची विचारशैली आणि काँग्रेसची विचारशैली म्हणजे दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव अशीच आहे असंही त्यांनी खोचकपणे सांगितले आहे.

हे वाचलं का?

संविधानिक विचारकडून प्रतिगामीकडे

अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे संविधानिक विचार सोडून ते प्रतिगामी विचाराकडे गेले आहेत. त्यामुळे त्यांनी या निर्णय का घेतला आहे हे त्यांनाच चांगले माहिती आहे. त्यांनी पक्षांतर केले असले तरी सध्याच्या युगात जनमत हे भाजपच्या बाजूने नाही तर काँग्रेसच्या बाजूने असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

स्वार्थ तपासले पाहिजे

काँग्रेसचे मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांच्यानंतर आता अशोक चव्हाण हे सुद्धा भाजपवासी झाले आहेत. या दिग्गज नेत्यांबद्दल बोलताना बाळासाहेब थोरातांनी सांगितले की, या लोकांना काँग्रेसने काहीच कमी केले नाही. मात्र या लोकांनी भाजपचे कमळ का हाती घेतले आहे हे तपासताना नेत्यांचे तुम्ही स्वार्थ तपासले पाहिजे अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Bhavana Gawali : शिंदेंच्या खासदाराला शेतकऱ्यांनी घेतलं फैलावर

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT