Devendra Fadnavis: लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र होणार?, फडणवीसांचं मोठं विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

dcm devendra fadnavis made a big statement on the discussion lok sabha and vidhan sabha elections will be held together
dcm devendra fadnavis made a big statement on the discussion lok sabha and vidhan sabha elections will be held together
social share
google news

Lok Sabha and Maharashtra Assembly elections: पुणे: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचे (BJP) चांगलेच धाबे दणाणले आहेत. कर्नाटकसारखं मोठं राज्य गमवावं लागल्याने भाजप नेते हे बरेच चिंतेत आहेत. त्यातही या निवडणूक निकालांचा परिणाम हा महाराष्ट्रावर अधिक होईल असं बोललं जात आहे. त्यामुळेच आगामी लोकसभा निवडणुकांसोबतच (Lok sabha Election) महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका (Maharashtra Vidhan Sabha Election) देखील घेतल्या जातील अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. याचबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी एक मोठं विधान केलं आहे. (dcm devendra fadnavis made a big statement on the discussion lok sabha and vidhan sabha elections will be held together)

ADVERTISEMENT

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची कुठलीही शक्यता नाही.’ असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (15 मे) रात्री पुण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं.

लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाही!

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात लोकसभा निवडणुका आम्ही संपूर्ण ताकदीने जिंकू आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागू आणि त्यादेखील जिंकू. या दोन्ही निवडणुका एकत्र होण्याची कुठलीही शक्यता नाही.’

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Sushilkumar Shinde : कर्नाटकचा मुख्यमंत्री महाराष्ट्रातील नेता ठरवणार!

‘वज्रमुठीला आधीच तडे गेले आहेत’

दरम्यान, यावेळी महाविकास आघाडी पुन्हा एकदा वज्रमूठ सभा प्रारंभ करणार असल्याच्या बाबतीत पत्रकारांनी प्रश्न विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘वज्रमुठीला आधीच तडे गेले आहेत. कुणी कुठे उभे रहायचे, कुणी कुठे बसायचे यावर अधिक चर्चा सुरू आहेत. या नेत्यांबद्दल शरद पवार यांनी आपल्या पुस्तकात विस्तृतपणे लिहिले आहे, त्यामुळे मी त्यावर बोलणार नाही. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील पोपट मेला आहे, हे पूर्णपणे कळले आहे. तरीही तो मान हलवतो आहे, त्याचे हातपाय हलताहेत, असे त्यांना बोलावे लागते. कारण, त्यांना तसा संदेश त्यांच्या लोकांना द्यायचा आहे.’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.

‘बारामतीवर तुमचं लक्ष अधिक असतं’

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन पुन्हा एकदा बारामती दौर्‍यावर येणार असल्याच्या बातम्यांबद्दल पत्रकारांनी विचारले असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘बारामतीवर तुमचे लक्ष अधिक असते, त्यामुळे तेथील केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी तुम्हाला दिसतात. पण अन्यही लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री येतात, दोन दिवस थांबतात आणि तेथील तयारीचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधतात.’

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> …म्हणून उद्धव ठाकरेंची साथ सोडली, गुलाबराव पाटलांनी सगळंच सांगितलं

राज्य सरकारने पुण्यातील प्रकल्पांना 1100 कोटींचा निधी दिलेला आहे. यात कात्रज-कोंडवा रस्ता सुद्धा आहे. पहिल्या टप्प्यासाठी 200 कोटी रुपये दिले आहे. जिल्हा विभाजनाच्या अनेक मागण्या आमच्याकडे आहेत. त्यामुळे त्यावर एकत्रितपणे विचार करण्यात येईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT