Delhi Ordinance Bill: केजरीवालांना BJP कडून मोठा धक्का, पहिल्याच परीक्षेत ‘INDIA’ फेल
दिल्ली सेवा विधेयक हे राज्यसभेत बहुमताने संमत झाल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह विरोधकांच्या INDIA या आघाडीला देखील मोठा धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT

Delhi Services Bill: नवी दिल्ली: राज्यसभेतील (Rajyasabha) सोमवारचा (7 जुलै) संपूर्ण दिवस दिल्ली सेवा विधेयकातच (Delhi Services Bill) गेला. गुरुवारी लोकसभेत मंजूर झाल्यानंतर हे विधेयक आज राज्यसभेत मांडण्यात आले. जिथे दिवसभर चर्चा झाली आणि रात्री उशिरा हे विधेयक मंजूर झाले. दिल्ली सेवा विधेयकाच्या बाजूने 131 मते पडली, तर विरोधात केवळ 102 मते पडली. आता या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळणे बाकी आहे. त्यानंतर तो कायदा म्हणून अस्तित्वात येईल. पण यामुळे ‘INDIA’ म्हणून विरोधकांचा जो पहिलाचा प्रयत्न होता तो अयशस्वी ठरला आहे. (delhi service bill also passed by rajya sabha big blow to delhi cm arvind kejriwal and india politics in marathi)
राज्यसभेत मतदानासाठी सर्वप्रथम मशीनद्वारे मतदानाची तरतूद करण्यात आली होते. मात्र काही वेळाने उपसभापतींनी मशीनमध्ये काही बिघाड असल्याने स्लिपद्वारे मतदान होणार असल्याचे जाहीर केले.
या विधेयकाबाबत काही विरोधी खासदारांनी दुरुस्त्याही मांडल्या होत्या. परंतु हे विधेयक मतदानाद्वारे मंजूर करण्यात आले आणि संसदेत दिल्ली सेवा विधेयकावरील चर्चा संपल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर दिले. यादरम्यान अमित शहा म्हणाले की, देशात काँग्रेसचे सरकार असताना विधेयकाच्या एका तरतुदीपूर्वी जी व्यवस्था होती, ती थोडीही बदलेली नाही.
विधेयक सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन नाही: अमित शहा
राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, हे विधेयक कोणत्याही कोनातून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत नाही. हे विधेयक म्हणजे दिल्लीतील केंद्र सरकारच्या विद्यमान अध्यादेशाची जागा घेण्याचा प्रयत्न आहे.