Ajit Pawar: ‘मी कुणाचीच…’, अजितदादांनी सोडलं मौन, मीरा बोरवणकरांना प्रत्त्युतर
येरवडा कारागृह जमिन आणि त्या बिल्डरच्या जागेविषयी माझा काहीही संबंध नाही असं स्पष्ट मत मीरा बोरवणकर यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. यावेळी अजित पवारांनी सांगितले की हे असली प्रकरणं पालकमंत्र्यांच्या अखात्यारित येत नसल्याने माझा आणि त्याचा काहीही संबंध नाही.
ADVERTISEMENT
Meera Borwankar: माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या मॅडम कमिशनर (Madam Commissioner) या आत्मचरित्राचे प्रकाशन झाल्यापासून आता राजकीय नेते चर्चेत आले आहेत. मीरा बोरवणकर यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये आपल्या नोकरीच्या काळात आलेल्या अनेक प्रसंगावर त्यांनी 38 प्रकरणं लिहिली आहेत. त्या आत्मचरित्रात (Biography) उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्याविषयी लिहिलेल्या प्रसंगावर जोरदार चर्चा सुरु आहेत. कारण येरवडा कारागृहाच्या जमिनीबाबत ज्या बिल्डराने न्यायालयात धाव घेतली होती. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्याकाळी पुण्याचे पालकमंत्री (Guardian Minister of Pune) होते. त्यावेळी त्यामध्ये आर. आर. पाटील (r. r. patil) यांनीही हस्तक्षेप केला होता असंही मीरा बोरवणकर यांनी सांगितले होते.
ADVERTISEMENT
अशा प्रकारणाना माझा विरोधच
मीरा बोरवणकर यांच्या मॅडम कमिशनर आत्मचरित्रात नाव आल्यामुळे चर्चेत आलेल्या गोष्टीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता स्पष्टीकरण देत त्यांनी आपली बाजू मांडली आहे. मीरा बोरवणकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, अशा प्रकारणाला माझा विरोधच असतो. मात्र माझ्या कार्यकाळात मी अशा लिलावात कधीच सहभाग घेतला नाही असंही त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा >> Ajit Pawar: ‘ते म्हणाले, मॅडम, तुम्ही यात पडू नका..’, मीरा बोरवणकरांचा आणखी मोठा गौप्यस्फोट
दबावाची पर्वा नाही
मीरा बोरवणकर यांच्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, “मी कधीही, कोणत्याही जमिनीच्या लिलावात सहभागी झालो नाही. खरं तर अशा लिलावांना माझा विरोधच असतो आणि आहे. याशिवाय जमिनीचा लिलाव करण्याचे अधिकार जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना नाहीत, त्यामुळे अशा प्रकारे सरकारी जमिनी विकू शकत नाही. राज्य मंत्रिमंडळासमोर ठेवण्यापूर्वी असे विषय महसूल विभागाकडे जातात. त्यावर मंत्रिमंडळ अंतिम निर्णय घेते. अशा प्रकरणात रेडी रेकनर दरानुसार जमिनीची किंमत ठरवली जाते. त्यामुळे या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. कोणत्याही दबावाची मी पर्वा करत नाही, अशा प्रकरणांमध्ये मी नेहमीच सरकारचीच बाजू घेतो, हे तुम्ही अधिकाऱ्यांकडे तपासू शकता.” असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या वादावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Meera Borwankar: अजित पवारांना थेट भिडलेल्या मीरा बोरवणकर आहेत तरी कोण?
बोरवणक बोलणार का?
मीरा बोरवणकर यांनी केलेल्या अनेक गौप्यस्फोटानंतर अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, या अशा गोष्टींना माझा विरोध आहे. त्यानंतर अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर आता मीरा बोरवणकर काही बोलणार का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT