Karnatka Election : राहुल गांधी ठरले ‘हिरो’, भारत जोडो’ची जादू चालली!
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसला कर्नाटकात फायदा झाला का? भारत जोडो यात्रे गेलेल्या मतदारसंघापैकी किती ठिकाणी काँग्रेसने विजय मिळवला? कर्नाटक निवडणुकीमुळे राहुल गांधी मोठे झाले का?
ADVERTISEMENT

Karnataka election 2023 and bharat jodo yatra : काँग्रेसने कर्नाटकचा बालेकिल्ला जिंकला आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला मोठा विजय मिळाला असून या विजयाने देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ मिळाल्याचं चित्र आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकची निवडणूक ही लिटमस टेस्ट मानली जात होती. ज्या पद्धतीने भाजपने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली कर्नाटकात जोरदार प्रचार केला आणि त्यानंतरही काँग्रेसने कर्नाटकात मोठा विजय मिळवून कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देण्याचे काम केले. काँग्रेसने 135 चा आकडा सहज पार केला आहे. आज काँग्रेसच्या छोट्या कार्यकर्त्यापासून मोठ्या नेत्यापर्यंत सर्वजण विजयाच्या जल्लोषात मग्न आहेत. (Did Rahul gandhi bharat jodo yatra impact on karnataka assembly election)
कर्नाटकमधील मोठ्या विजयाबद्दल पंतप्रधान मोदींनीही ट्विट करत काँग्रेसचे अभिनंदन केले आहे. पीएम मोदी म्हणाले, “कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल मी काँग्रेसचे अभिनंदन करतो. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो.”
काँग्रेसचा जल्लोष
देशभरात कर्नाटकच्या विजयाचा जल्लोष काँग्रेस करत आहे. या विजयाचे श्रेय सर्व काँग्रेसजन राहुल गांधींना देत आहेत. गेल्या दशकभरापासून काँग्रेस राजकीय अस्थिरतेचा सामना करत आहे. 2014 पासून आतापर्यंत 50 हून अधिक निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आहे. मात्र गेल्या 6 महिन्यांत काँग्रेसचा हा दुसरा मोठा विजय आहे. प्रथम हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक. कर्नाटकात राहुल गांधींची भारत जोड यात्रा 20 विधानसभा मतदारसंघातून गेली. त्यापैकी भाजपला केवळ 2 विधानसभा मतदारसंघ जिंकता आले आहेत, तर काँग्रेसने 15 विधानसभा मतदारसंघ जिंकले आहेत.
राहुल गांधींचं असं झालं स्वागत
या विजयानंतर ढोल-ताशांच्या तालावर कर्नाटकचा विजय साजरा करण्यात आला. राहुल गांधी यांचे पक्ष कार्यालयात जोरदार स्वागत करण्यात आले. कर्नाटकात काँग्रेसचा विजय निश्चित होताच राहुल गांधी दिल्लीतील पक्ष कार्यालयात पोहोचले आणि मीडियासमोर आले. त्यानंतर 6 वेळा नमस्कार करतात आणि त्यानंतर थेट कर्नाटकच्या जनतेचे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे आभार आणि अभिनंदन करतात. राहुल म्हणाले, “कर्नाटकात द्वेषाचा पराभव झाला आणि प्रेमाचा विजय झाला.”