“महादेवराव महाडिक, तुम्ही नाही तर 42 हजार मतांनी आमदार केलं…” सतेज पाटील
बंटी पाटील विरुद्ध महाडिक कुटुंबीय… कोल्हापूरच्या राजकारणाचा पारा वाढवणारी छत्रपती राजाराम महाराज कारखान्याची निवडणूक
ADVERTISEMENT
कोल्हापूर : महादेवराव महाडिक तुमचं एक मत पडलं का मला फक्त? करवीरमधील मतदारांनी 42 हजारांच्या मताधिक्याने मला निवडून दिलं, असं म्हणतं माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार सतेज उर्फ बंटी पाटील (Satej Patil) यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadeorao Mahadik) यांना प्रत्युत्तर दिलं. ते करवीर तालुक्यातील वडणगे इथे पार पडलेल्या छत्रपती राजाराम महाराज कारखाना निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते. (Satej Patil vs Dhananjay Mahadik issue in Kolhapur)
ADVERTISEMENT
२००४ मध्ये बंटी पाटीलला आमदार केलं ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक झाली, अशी खंत बोलून दाखवत माजी आमदार महादेव महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर टीका केली होती. या टीकेला, प्रत्युत्तर देताना पाटील म्हणाले, महादेवराव महाडिक तुमचं एक मत पडलं का मला फक्त? करवीरमधील मतदारांनी 42 हजारांच्या मताधिक्याने मला निवडून दिलं. तेव्हा एकत्र होतो, संघटित होतो, पण तरीही करवीरमध्ये तुमची एवढी ताकद होती तर तुम्ही 1995 मध्ये 40 हजार मतांनी का पराभूत झालात? असा सवाल पाटील यांनी महादेवराव महाडिक यांना केला.
बंटी पाटील की मुन्ना महाडिक… कोल्हापूरचा किंग कोण?, ‘ही’ निवडणूक ठरवणार!
ते पुढे म्हणाले, 2005 मध्ये मी आणि आमदार पी. एन. पाटील यांनी त्यांना काय मदत केली याचं त्यांनी आत्मचिंतन करावं, काय मदत केली ते जाहिरपणे सांगतं नाही, पण तेव्हा जर आम्ही तुमची मदत केली नसती, तेव्हा जर बंटी पाटील आणि पी एन पाटील नसते तर तुम्ही कुठे असता हे एकदा महाडिक साहेबांनी सांगावं, असं आव्हान त्यांनी महादेवराव महाडिक यांना दिलं.
हे वाचलं का?
भ्यायचा विषय नव्हता… :
सतेज पाटील पुढे म्हणाले, काल मला बिंदू चौकात बोलावलं, तिथे आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम सुरू होता, मी भिलो नव्हतो, हे मी जाहीरपणे सांगतो. भ्यायचा विषयच नव्हता, मी गृहराज्यमंत्री म्हणून काम केलं आहे. मी जर त्या ठिकाणी गेलो असतो आणि काही विपरीत झालं असता तर जिल्ह्याचा नेता म्हणून माझ्यावरच ठपका पडला असता. महाडिक यांना या गोष्टीचं काही महत्त्व नाही. ते या मातीतले नाहीत, मी या मातीतला आहे असं म्हणत ते बाहेरून आलेले आहेत त्यांना कोल्हापूरची बदनामी झाली काय याचं काय देणं घेणं नाही. ईस्ट इंडिया कंपनी जशी भारतात आली आणि मोठी झाली तसं महाडिक कंपनी इथं येऊन मोठे झाले.
Kolhapur : “भ्याल रे भ्याल महाडिक भ्याल…” : सव्वा लाख कागदपत्रांसह सतेज पाटील मैदानात
काल ज्या घटना घडल्या त्यावरुन असं दिसते की त्यांना ही निवडणूक वेगळ्या दिशेला न्यायची असावी. पण आपण सर्वांनी संयम राखला पाहिजे. आपण त्यांना विचारते दोनशे रुपये कमी दर का देताय ते म्हणतात डी वाय पाटील कारखान्याचे पहिल्यांदा सांगा. मला कळत नाही निवडणूक राजाराम कारखान्याची आहे की डी. वाय. पाटील कारखान्याची? ज्या वेळेला डी वाय पाटील कारखान्याची निवडणूक लागेल तेव्हा मी जाहीरपणे उत्तर द्यायला सक्षम आहे. तुम्ही 28 वर्षे राजाराम कारखान्याचा व्यवहार चोख केलाय म्हणता त्याचं उत्तर द्या, असं आव्हान त्यांनी दिलं
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT