Eknath Khadse भाजपमध्ये घरवापसी करणार? अखेर मिळालं उत्तर

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

एकनाथ खडसे भाजपमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा सध्या होत आहे.
eknath khadse explanation of buzzing about join bjp
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एकनाथ खडसे यांचे ट्विट

point

गिरीश महाजन यांनी केलेल्या दाव्याला दिलं उत्तर

point

भाजपत जाण्याबद्दलच्या वृत्तावर खडसेंचा खुलासा

Eknath Khadse Latest News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर राज्यात मोठे राजकीय भूकंप होण्याचे दावे भाजपकडून गेले जात आहे. काँग्रेसमधील काही नेतेही भाजपत प्रवेश करणार असून, एकनाथ खडसेही त्याच्यासाठी प्रयत्न करत असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले होते. त्यावर खडसेंनी मौन सोडत खुलासा केला आहे. (Eknath Khadse Reaction on buzzing About join BJP)

ADVERTISEMENT

शि्वसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर काँग्रेसलाही हादरे बसणार, अशी चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू आहे. त्यातच माजी अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपचा हात धरल्याने याला दुजोरा मिळाला असून, आणखी कोण-कोण भाजपत जाणार, याबद्दल वेगवेगळी नावांविषयी बोलले जात आहे. त्यात एक नाव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचेही आहे. 

भाजपमध्ये परतण्यासाठी खडसेंचे प्रयत्न?

भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना असं म्हटलं की, "एकनाथ खडसे हे भाजपमध्ये परतण्यासाठी फार जोर लावत आहेत, असे मला कळले आहे. दिल्लीतून आणि राज्यातून माझ्यापर्यंत या बातम्या आल्या आहेत. पण, नेत्यांकडून मला याबद्दल विचारणा झालेली नाही."

हे वाचलं का?

"एकनाथ खडसेंना पक्षात घ्यायचं की नाही, याबद्दल मला अजून कुणी विचारलेलं नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे. एकनाथ खडसे यांची हॉटलाईन असेल, तर त्यांनी लावावी", असे गिरीश महाजन म्हणालेले. 

महाजन यांच्या याच विधानानंतर एकनाथ खडसे भाजपत घरवापसी करणार अशी चर्चा सुरु झाली. पण, या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर एकनाथ खडसेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. 

ADVERTISEMENT

एकनाथ खडसे काय म्हणाले?

भाजपत परतणार असल्याच्या वृत्ताबद्दल खडसे म्हणाले, "गेले काही दिवसापासून मी भाजपा मध्ये प्रवेश करणार, अशा आफवा माझ्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा, या हेतूने पसरविल्या जात आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आहे व राहणार. कार्यकर्त्यांनी, आणि नागरिकांनी अशा आफवांकडे दुर्लक्ष करावे", अशी भूमिका एकनाथ खडसे यांनी मांडली आहे.

ADVERTISEMENT

 एकनाथ खडसे हे आधी भाजपमध्येच होते. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत त्यांनी भाजप सोडली. त्यानंतर शरद पवारांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ते शरद पवार यांच्या पक्षात थांबले. सध्या ते विधान परिषदेचे आमदार आहे. त्याचबरोबर रावेर लोकसभा मतदारसंघातून ते लोकसभा निवडणूक लढवतील, अशीही चर्चा आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT