Eknath Shinde : ''मला अडकण्याचा डाव होता'', मुख्यमंत्री शिंदेंच्या विधानाने खळबळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

eknath shinde reaction on parambeer singh allegation on udhhav thackeray sharad pawar anil deshmukh mumbaitab baithak 2024
शिंदे यांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मी सहकारी असताना मलाही अडकवण्याचा डाव होता

point

परमबीर सिंहच्या आरोपावर शिंद काय म्हणाले?

point

शिंदे यांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ

Eknath Shinde On Parambeer Singh Allegataion : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आता आरोपांचा नवा बॉम्ब फोडला होता. यावेळी परमबीर सिंह यांनी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अटकेचे आदेश देण्याचा खळबळजनक आरोप केला होता. या आरोपांवर आता मुंबई Tak बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी पुष्टी दिली आहे. ''मी सहकारी असताना मलाही अडकवण्याचा डाव होता'', असे शिंदे (Eknath Shinde) म्हणाले आहेत. शिंदे यांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. (eknath shinde reaction on parambeer singh allegation on udhhav thackeray sharad pawar anil deshmukh mumbaitab baithak 2024) 

मुंबई Tak बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी परमबीर सिंह यांनी ठाकरे, पवार आणि देशमुखांवरील आरोपावर भाष्य केले. विशेष म्हणजे परमबीर सिंह यांनी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अटकेचे आदेश देण्याचा खळबळजनक आरोप केला होता. या आरोपावर बोलताना शिंदे म्हणाले की, परमबीर सिंह यांच्या आरोपात तथ्य आहे.मी सहकारी असून मला देखील अडकण्याचा प्रयत्न झाला होता,असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या काळात मला अडकवण्याचा प्रयत्न झाला.यावर मी योग्यवेळी बोलणार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. 

हे ही वाचा : Pankaja Munde Mumbaitak Baithak 2024 : प्रीतम मुंडेंचं पुनर्वसन होणार का? पंकजा मुंडेंचं मोठं विधान

शिंदे यांनी यावेळी मातोश्रीवर झालेल्या आंदोलनावर देखील भाष्य केले. त्यांना संताजी, धनाजींसारखा मीच दिसतो. मी मु्ख्यमंत्री झालोय हे त्यांना अजून पचत नाही. आमचे सरकार पडणार असल्याचं रोजच बोललं जातं,असा चिमटा देखील त्यांनी ठाकरेंना काढला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

परमबीर सिंहांचा आरोप काय? 

परमबीर सिंह यांनी एनआयला प्रतिक्रिया दिली आहे. ''ठाण्यातील एका जमीन प्रकरणात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यात मलाही गोवण्याचा प्रयत्न झाला'', असा आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे. ''ऐवढेच नाही तर या प्रकरणी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अटकेचेही आदेश देण्यात आले होते. हे सर्व संजय पांडे यांच्या मार्फत सुरू होते. आणि त्यांना डायरेक्ट आदेश अनिल देशमुख, शरद पवार आणि तत्काली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मिळत होते, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात माझ्याकडे व्हिडिओ पुरावे देखील आहे, आणि वेळ आल्यावर ते सादर देखील करेन'', असे सिंह यांनी सांगितले. 

परमबीर सिंह पुढे म्हणाले, ''अनिल गोटे नावाचे माजी आमदार आहेत, चव्हाण नावाच्या सरकारी वकिलासह मुंबईत आले होते. त्यांची अनिल देशमुखांसोबत मी मिटींग झाली होती. या मिटींगला मलाही बोलवण्यात आले होते. त्यावेळेस माझ्यावर गिरीष महाजन आणि जयकुमार रावल यांनाही अटक करण्यासाठी आपल्यावर दाबव टाकला होता असंही त्यांनी सांगितले. त्यानंतर पुन्हा सिल्व्हर ओकवर एक बैठक बोलावली होती या बैठकीत शरद पवार देखील उपस्थित होते. त्यावेळेस देखील माझ्यावर गिरीष महाजन आणि जयकुमार रावल यांच्या अटकेसाठी दबाव टाकला होता'', अशा खळबळजनक दावा परमबीर सिंह यांनी केला. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Devendra Fadnavis Mumbai Tak Baithak 2024: 'मुख्यमंत्री होणार की दिल्लीत जाणार?'; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली मनातील गोष्ट

''उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी सुद्धा एक बैठक झाली होती. या बैठकीला अनिल देशमुख उपस्थित होते. त्यावेळेस प्रविण दशिवाय मुंबई बँकेचे संचालक प्रविण दरेकर यांच्या विरोधातही कारवाई करण्यास सांगितले होते. मात्र असे करण्यास आपण नकार दिली होता,'' असेही ते म्हणाले.
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT