“मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी”, रश्मी ठाकरे-उद्धव ठाकरेंचे भाजपने शेअर केले फोटो

मुंबई तक

ADVERTISEMENT

Former Chief Minister Uddhav Thackeray visit to Konkan BJP criticizes Shiv Sena by posting photos from Vande Bharat Express
Former Chief Minister Uddhav Thackeray visit to Konkan BJP criticizes Shiv Sena by posting photos from Vande Bharat Express
social share
google news

Shiv sena: पंतप्रधान नरेंद्र मोंदी (PM Narendra Modi) यांच्या मेक इन इंडिया (Make In India) या संकल्पनेतून वंदे भारत ट्रेनची (Vande Bharat Express) निर्मिती करण्यात आली. त्याच वंदे भारत ट्रेनमधून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former CM Uddhav Thackeray) यांनी कोकणात दौरा करत मोदी सरकार आणि भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. ज्या वंदे भारत ट्रेनमधून जात कोकण पिंजून काढत, ‘थांबा 400 पार कसे जातात तेच बघतो’ असं थेट आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचा फोटो भाजपने शेअर करत ‘मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी’ म्हणत खोचकपणे भाजपकडून ट्विट केले आहे.

कोकण दौऱ्यात भाजपवर निशाणा

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रायगडपासून सावंतवाडीपर्यंतचा कोकण दौरा पिंजून काढला. कोकणात झालेल्या सभेतून त्यांनी थेट भाजपला आव्हान देत राज्य सरकारवरही त्यांनी जोरदार निशाणा साधला होता. त्यामुळेच भाजपने उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचा वंदे भारत ट्रेनमधील फोटो शेअर करत ‘मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी’ म्हणून त्यांना टोला हाणला आहे.

हे ही वाचा >> Shiv Sena : आधी श्रीकांत शिंदे, आता एकनाथ शिंदेंचा फोटो; संजय राऊतांनी बापलेकाला घेरलं

400 पार टार्गेट

उद्धव ठाकरे यांनी रायगड, कणकवली, सावंतवाडीतून भाजपवर आणि केंद्र सरकारवर निशाणा साधताना त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. लोकसभेला भाजपचे 400 पार टार्गेट ठेवण्यात आले आहे. त्यावर बोलताना त्यांनी भाजपवर आणि नरेंद्र मोदींच्या अश्वासनांवर टीका केली होती. त्यामुळेच भाजपनेही त्यांच्यावर या फोटोच्या निमित्ताने निशाणा साधला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

‘मोदी की गॅरेंटी’

यावेळी भाजपवर टीका करताना त्यांनी थांबा चारशे पार कसे जातात तेच बघतो असं थेट आव्हान त्यांनी दिल्यामुळेच फोटोच्या खाली कॅप्शन देतानाही त्यांनी ‘तिसरी बार…मोदी सरकार’असाही टोला त्यांनी त्यांना हाणला आहे. भाजपने उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंचा फोटो शेअर करत असताना त्याखाली मोदी की गॅरेंटी म्हणत त्यानी हॅशटॅग वापरला आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर भाजप आणि ठाकरे वाद रंगणार का असा सवालही उपस्थित केला जात आहे.

ADVERTISEMENT

हल्ला प्रतिहल्ला

भाजपने शेअर केलेल्या फोटोला कमेंटही तेवढ्याच जोरदारपणे पडल्या आहेत. त्यामुळे सभांमधून ज्या प्रकारे भाजपवर निशाणा साधण्यात आला होता, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंचा प्रवासातील फोटो शेअर करत त्यांनाही त्यांनी मोदी की गॅरेंटी असा प्रतिहल्ला त्यांच्यावर करण्यात आला आहे.

हे ही वाचा >> Maharashtra : ‘राजकीय गुडांपासून सरंक्षण द्या’, CM शिंदेंना कुणी पाठवलं पत्र?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT