Bhagat Singh Koshyari: “अजितदादांची मला दया येते, पण…”; कोश्यारींच्या विधानाने उंचवल्या भुवया

मुंबई तक

ADVERTISEMENT

Bhagat Singh Koshyari ncp mla ajit pawar deputy cm Ajit Pawar mercy come sharad pawar
Bhagat Singh Koshyari ncp mla ajit pawar deputy cm Ajit Pawar mercy come sharad pawar
social share
google news

Bhagat singh koshyari on Ajit Pawar: ‘अजित पवार हे एक असे राजकीय व्यक्तिमत्व आहे ते कायम उपमुख्यमंत्री बनण्यासाठी तयार असतात. त्यामुळे मला कधी कधी त्यांची दया येते. मात्र ते तेवढेच हुशारही आहेत. संघटनेवर त्यांचे प्रभुत्व आहे.’ असे मत महाराष्ट्राराचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले आहे. त्यांची दया येते असं त्यांनी म्हटले असले तरी त्याचवेळी त्यांनी त्यांची संघटनेवर असलेली हुकमतीचेही त्यांनी कौतुक केले आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी अजित पवार यांच्यावर टिप्पणी करताना त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचेही मोठेपण त्यांनी अधोरेखित केले आहे. (Bhagat Singh Koshyari said that he mercy comes for Ajit Pawar, but Sharad Pawar was big political leader)

पवारांचे मोठेपण  आणि अजितदादांची दया

देशातील प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती शरद पवार यांचा आधार करते, एवढं त्यांचे मोठेपणही आहे. त्यामुळे आम्ही राजकीय गोष्टींबाबत एकमेकांवर बोलत असलो तरी शरद पवार यांच्याविषयी मला नेहमीच आधार राहिला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> INDIA@ 100: Metaverse.. भारतासाठी महासत्तेचा पासवर्ड!

भगतसिंह कोश्यारी यांनी एकाच वेळी पवार कुटुंबीयांवर आपलं मत व्यक्त करत देशातील राजकारणात शरद पवार यांचे स्थान काय आहे हेही त्यांनी बोलताना आधोरेखित केले आहे. त्यांना दोन विद्यापीठांची डिलीट पदवी माझ्या हस्ते प्रदान करण्याचा मला मानही मिळाला असल्याची आठवणही त्यांनी सांगितली.

हे ही वाचा >> Sharad Pawar: ‘जे महिलेनं सुनावलं ते…’, पवारांनी कोल्हापुरात जाऊन मुश्रीफांना डिवचलं!

आठवण पहाटेच्या शपथविधीची

माजी राज्यपाल कोश्यारी यांनी शरद पवार यांचे मोठेपण सांगताना त्यांनी अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर प्रश्न विचारताच त्यांनी त्यांची दया येते असा टोलाही लगावला.

ADVERTISEMENT

उपमुख्यमंत्री पदासाठी ते तयारच

अजित पवार हे असं राजकीय व्यक्तिमत्व आहे ज्यांनी तुम्ही कितीही वेळा उपमुख्यमंत्री बनवला तरी त्यासाठी अजित पवार तयार असतात. त्यामुळे मला त्यांची दया येते अशी खोचक टीकाही केली. त्यानंतर त्यांनी त्यांचे संघटन कौशल्य, त्यांचे नेतृत्व आणि पक्षातील स्थान यावर कोश्यारी यांनी आपल्या शैलीत मत व्यक्त केले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT