Chhagan Bhujbal: ‘कुणबी प्रमाणपत्र देणं चुकीचं’, मराठा आरक्षणावर भुजबळांचं खळबळजनक विधान
Chhagan Bhujbal ‘मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र देणं चुकीचं आहे’, असं थेट विधान करत छगन भुजबळ यांनी राज्यातील त्यांच्याच सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT

Chhagan Bhujbal on Maratha Reservation: बीड: ‘एकीकडे पोलिसांना हतबल करायचं आणि दुसरीकडे कुणबी प्रमाणपत्र (kunbi certificate) फटाफट सर्व मार्गाने द्यायचं हे काही बरोबर आहे असं काही मला वाटत नाही. हे सगळं चुकीचं होत आहे.’, असं भुवया उंचावणारं विधान शिंदे सरकारमधील कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलं आहे. बीड दौऱ्यावर असताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा समाजाला (Maratha Aarakshan) थेट कुणबी प्रमाणपत्र देण्यावर सपशेल आक्षेप दिला आहे. तसंच मराठा समाजाला कुणबी प्रमाणप देणं चुकीचं असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. (giving kunbi certificate to maratha community people is wrong chhagan bhujbal sensational statement on maratha reservation)
मराठा समाजाच्या आरक्षणावर छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
‘आज आरक्षण संपवण्याचं काम हे राज्यात सुरू आहे. असं नाही की, मराठा समाजासाठी सांगताना तुम्ही सांगता की, तीन न्यायमूर्तींची कमिटी नेमली. अरे तुम्ही सगळ्यांनाच कुणबी प्रमाणपत्र देत आहात. मग ती समिती काय करायची आहे आता? तुम्ही बॅकडोअर एंट्री देत आहात.. तुम्ही फ्रंटडोअर एंट्री द्या कायद्याने.. सुप्रीम कोर्टात अडलेलं आहे तिथून घ्या ना तुम्ही आरक्षण. पण तुम्हाला बॅकडोअर एंट्री द्यायची आहे.’
‘मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं चुकीचं’
‘सगळ्यांनाच दुकानं आता.. सगळ्या जिल्ह्यांमध्येच या-या आणि घ्या-घ्या.. कोणत्याही समाजाचा असेल तर वडिलांचं आजोबांचं असे सगळे पुरावे मागितले जातात. आता मात्र लगेच मिळालं.. त्यात ते वंशावळ.. म्हणजे एकाला मिळालं तर त्याचे जेवढे काही नातेवाईक आहे ते आपोआपच आले कुणबी.. पण हे कायद्याच्या विरुद्ध आहे. महाराष्ट्र हा सर्व समाजाचा आहे. यशवंतराव चव्हाणांनी सांगितलेलं की, महाराष्ट्र हा मराठी आहे.’
हे ही वाचा >> Manoj Jarange: CM शिंदे एकटे पडले, लढले अन् जिंकले… जरांगेंसोबतच्या ‘त्या’ फोन कॉलची Inside Story
‘राज्यकर्त्यांना सांगायचं आहे तुम्ही याचा विचार करा.. लोकांना काही कळत नाही अशातला काही भाग नाही. एकीकडे पोलिसांना हतबल करायचं आणि दुसरीकडे कुणबी प्रमाणपत्र फटाफट सर्व मार्गाने द्यायचं हे काही बरोबर आहे असं काही मला वाटत नाही. हे सगळं चुकीचं होत आहे.’ असं मोठं विधान छगन भुजबळांनी केलं आहे.










