…म्हणून उद्धव ठाकरेंची साथ सोडली, गुलाबराव पाटलांनी सगळंच सांगितलं
शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याबद्दल प्रथमच भाष्य केलं. शिवसेनेचे आमदार शिंदेंसोबत गेल्यामुळे आपणही गेलो, असं ते एका कार्यक्रमात म्हणाले.
ADVERTISEMENT
शिवसेनेतील फूट आणि नंतर झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी पहिल्यांदाच सडेतोड भाष्य केलं. 1987 चा किस्सा सांगत गुलाबराव पाटलांनी त्यांची आमदारकी जाण्यची भीतीही बोलून दाखवली. मंत्रिपद सोडलं होतं, पण आकडा जुळला नसता, तर आमदारकीही गेली असती, असं पाटील म्हणाले. गुलाबराव पाटलांच्या भाषणाची आता जोरात चर्चा सुरू आहे. ()
ADVERTISEMENT
गुलाबराव पाटील यांनी एका कार्यक्रमात ठाकरेंची साथ सोडून जाण्याबद्दल प्रथमच भाष्य केलं आहे. “लोकांनी आम्हाला गद्दारी केली म्हटलं. मी 33वा होतो, माझ्या आधी 32 लोक गेले होते. जळगाव जिल्ह्यात पाच आमदार होते. पाच पैकी चार माझ्याआधी पळून गेले. मी एकटा राहिलो. नंतर नागपूरचाही पळून गेला. बुलढाणावालेही गेले. नाशिकचेही गेले. दादरचेही गेले. ठाण्याचेही गेले. राहिलो मी एकटा. म्हणजे नागपूर ते मुंबई मी एकटा राहिलो होतो.”
ठाकरेंची साथ का सोडली? गुलाबरावांनी स्पष्ट सांगितलं
एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी आधी बंडखोरी केली होती. त्यानंतर एक एक आमदार ठाकरेंची साथ सोडून गेले. गुलाबराव पाटील यांचा 33 वा क्रमांक होता. या सगळ्यावर बोलताना पाटील म्हणाले, “काय केलं असतं मी? एवढी काम झाली असती का? मी विचार केला की, चार गेले. चारही खांदे गेले तर मी काय करू? मग मीही गेलो. नंतर माझ्यावर टीका सुरू झाली, काय झाडी, काय डोंगर,… पण जर मी चुकीचा निर्णय घेतला असता तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये ही जी कामं होताहेत, ती एवढी कामं आपल्या मतदारसंघात झाली नसती.”
हे वाचलं का?
बाळासाहेबांची शिकवण… 1987 किस्सा काय?
गुलाबराव पाटील यांनी यावेळी शिवसेनेचं सदस्य स्वीकारातानाची आठवणही सांगितली. त्याचबरोबर बाळासाहेबांनी शिवसेनेचा सांगितलेला अर्थही त्यांनी उपस्थितांना ऐकवला. “मी 1987 मध्ये शिवसैनिक झालो. त्यावेळी बाळासाहेबांनी आम्हाला हेच शिकवलं की, मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी उभी असलेली… शि म्हणजे शिस्तबद्ध, व म्हणजे वचनबद्ध, से म्हणजे सेवाभावी आणि ना म्हणजे नामर्दांना जिथे स्थान नाही, ती मर्दांची संघटना म्हणजे शिवसेना”, असं ते म्हणाले.
“चार शब्दांवर आम्ही शिवसेनेत गेलो. जे माझ्यावर टीका करताहेत, त्यांना माझं आव्हान आहे. हे मंत्रिपद मला सहज मिळालेलं नाही. 15 ते 20 वेळा मी तुरूंगात गेलो. आंदोलनं केली. चिंगार ए मोर्चा म्हणून गुलाबराव पाटील या महाराष्ट्रात प्रसिद्ध होता. हे पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे. पूर्ण आयुष्य आम्ही विरोधात घातलं आहे. त्यावेळी आम्ही सत्तेची लालसा केली नाही”, असं गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
हिंदुत्वासाठी आम्ही सट्टा खेळलो -गुलाबराव पाटील
“उद्या जर हा आकडा जमला नसता, तर… मी तर मंत्रिपद सोडून गेलो होतो. आमदारकी पण गेली असती. आम्ही सट्टा खेळलो, सट्टा. हिंदुत्वासाठी सट्टा खेळलो. ज्या भगव्या झेंड्याकरिता बाळासाहेबांनी पूर्ण आयुष्य वेचलं. त्या भगव्या झेंड्याला वाचवण्याकरिता आम्ही भाजपसोबत गेलेलो आहोत. हे आम्ही पाप केलेलं असेल, तर लोकांनी पाप म्हणावं. पण, आम्ही हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, शिवसेनाप्रमुखांच्या विचाराला तेवत ठेवून भाजपसोबत पुन्हा युती केली”, अशी भूमिका गुलाबराव पाटील यांनी या प्रकरणावर मांडली.
ADVERTISEMENT
“मला वाटतं आम्ही पक्ष सोडलेला नाही. दुसऱ्या पक्षात गेलेलो नाही. अजूनही आमच्या पक्षाचं नाव शिवसेना पक्ष आहे. अजूनही धनुष्यबाण आणि झेंडा तोच आहे”, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT