Pooja Khedkar: IAS पूजा खेडकरांचं ते WhatsApp चॅटच आलं समोर, नेमकं काय आहे यात?

मुंबई तक

Pooja Khedkar WhatsApp Chat: IAS पूजा खेडकर यांच्या अडचणी आता दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यांनी पुण्यात असताना नेमक्या काय मागण्या केलेल्या याचं WhatsApp चॅट आता समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

IAS पूजा खेडकरांचं ते WhatsApp चॅट
IAS पूजा खेडकरांचं ते WhatsApp चॅट
social share
google news

बातम्या हायलाइट

point

IAS पूजा खेडकर यांचे WhatsApp चॅट आलं समोर

point

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली पूजा खेडकरांची तक्रार

point

पूजा खेडकर आता वाशिममध्ये रुजू

IAS Pooja Khedkar WhatsApp Chat पुणे: महाराष्ट्र केडरची प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर या सध्या चर्चेत आहे. पूजा खेडकर यांच्यावर यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी अपंगत्व आणि नॉन क्रिमिलियरचे बनावट प्रमाणपत्र दाखवल्याचा आरोप आहे. पूजा यांनी 2021 मध्ये परीक्षा दिली होती आणि त्यांचा अखिल भारतीय रँक 821 होता. पण आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप आहे, त्यामुळे आता त्यांची वाशिमला बदली करण्यात आली आहे. याचवेळी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यानी पूजा खेडकरांबाबत जो अहवाल शासनाला दिला होता त्यात पूजा खेडकरांचे WhatsApp चॅट देखील जोडण्यात आले आहेत. हेच चॅट आता समोर आले आहे. (ias pooja khedkar whatsapp chat surfaced what exactly is in it pune collector report)

पुण्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी पूजा यांनी स्वत:साठी स्वतंत्र कार्यालय, एक कार आणि घराची मागणी केली होती, असे तिच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्याशी झालेल्या व्हॉट्सॲप चॅटमधून समोर आले आहे. चॅटमध्ये, 3 जूनला रुजू होण्याआधी त्यांनी वरील गोष्टींची मागणी केली होती, तशा स्वरूपाच्या सूचना त्यांना अधिकाऱ्याना करताना दिसत आहे.

हे ही वाचा>> Pooja Khedkar : पूजा खेडकरांचा आणखी पाय खोलात, मॉक इंटरव्ह्यू अडचणी वाढणार? Video Viral

चॅटमधून या गोष्टी झाल्या उघड 

चॅटमधून असं समोर आलं की, त्या अधिकाऱ्याला म्हणाल्या की, 'मी 3 जूनला रुजू होण्यापूर्वी केबिन किंवा वाहनाचे काम पूर्ण करा, नंतर वेळ मिळणार नाही. हे शक्य नसेल तर मला कळवा, मी याबाबत जिल्हाधिकारी सरांशी बोलेन.' जिल्हाधिकाऱ्यांनी या असामान्य मागण्या मुख्य सचिवांकडे मांडल्या होत्या, त्यांनी त्यांच्या अहवालात पूजा खेडकरांचे प्रशिक्षण पुण्यात सुरू ठेवणे अयोग्य असल्याचे सुचविले होते आणि त्यामुळे प्रशासकीय गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

प्रोबेशनवर असणाऱ्या IAS ला या सुविध नाहीत!

परिविक्षाधीन अधिकारी पूजा खेडकर यांना परिविक्षाधीन असताना या सुविधांचा अधिकार नसून त्यांना निवासाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर 2023 बॅचच्या IAS अधिकारी पूजा खेडकर यांची प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. वाशिममध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आले आणि त्या 30 जुलै 2025 पर्यंत 'सुपरन्युमररी असिस्टंट कलेक्टर' म्हणून काम करतील.

हे वाचलं का?

    follow whatsapp