Jayant Patil, IL&FS scam : नऊ तास चौकशी, पण ईडीने पाटलांना कोणते प्रश्न विचारले?
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून तब्बल नऊ तास चौकशी करण्यात आली. ज्या आरोपांवरुन जयंत पाटलांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं, त्याबाबत एकही प्रश्न विचारण्यात आला नसल्याचं पाटील सांगत असतील, तर पाटलांना नेमके कुठले प्रश्न विचारण्यात आले असा प्रश्न निर्माण होतो.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून तब्बल नऊ तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ‘ईडीला सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत आणि ईडीचं समाधान झालं असेल’, असं जयंत पाटील म्हणाले. या नऊ तासांच्या चौकशीत पाटलांना कुठले प्रश्न विचारण्यात आले आणि पाटलांनी त्याची काय उत्तरं दिली? हेच समजावून घेऊयात…
ADVERTISEMENT
आयएल अण्ड एफएस या कंपनीला 2008 ते 2014 या कालावधीमध्ये रस्ते उभारणीचे कंत्राट देण्यात आलं होतं. या कंपनीकडून इतर कंपन्यांना उप कंत्राट देण्यात आली होती. या सब कॉन्ट्रॅक्टरने कथितरित्या जयंत पाटील यांच्याशी निगडीत कंपन्यांना पैसे दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या आरोपावरुन ईडीने जयंत पाटील यांना समन्स बजावलं होतं. त्यानुसार जयंत पाटील हे चौकशीला हजर झाले.
हेही वाचा >> Hingoli Crime: वडिलांचे हात-पाय बांधले अन् नराधमाने आईवरच केला बलात्कार
ईडीने जयंत पाटलांना अनेक प्रश्न विचारले. परंतु त्यातील एकही प्रश्न हा आयएल अण्ड एफएस या कंपनीबाबत नव्हता, असं पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्याचबरोबर या कंपनीशी आपला कुठलाही संबंध नाही, असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
हे वाचलं का?
जयंत पाटील यांनी ईडीने कोणते प्रश्न विचारले…?
ज्या आरोपांवरुन जयंत पाटलांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं, त्याबाबत एकही प्रश्न विचारण्यात आला नसल्याचं पाटील सांगत असतील, तर पाटलांना नेमके कुठले प्रश्न विचारण्यात आले असा प्रश्न निर्माण होतो.
राष्ट्रवादीतील खात्रीलायक सुत्रांनी ‘मुंबई Tak’ला दिलेल्या माहितीनुसार पाटील कुटुंबाकडे मालकी असलेल्या राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याबाबात त्यांना प्रश्न विचारण्यात आले. या कारखान्याबाबतच्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टी यावेळी पाटलांना विचारण्यात आल्या.
ADVERTISEMENT
हा साखर कारखाना कोणी स्थापन केला?, या कारखान्याच्या संचालक मंडळावर कोण कोण होतं?, कारखान्याची उत्पादन क्षमता, त्याची आर्थिक उलाढाल याबाबत देखील विचारण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> त्र्यंबकेश्वर वाद : अजित पवार तापले, दंगलीचा उल्लेख करत फडणवीसांवर प्रहार
केवळ साखर कारखानाच नाही, तर राजाराम बापू सहकारी बँकेबाबत देखील पाटलांना विचारणा करण्यात आली. या बँकेचे व्यवहार, वार्षिक उलाढाल याबाबतची माहिती ईडीकडून घेण्यात आली.
ही सगळी माहिती घेतल्यानंतर पुढील संदिग्धता टाळण्यासाठी जंयत पाटलांना स्टेटमेंट दाखवण्यात आलं. पाटलांनी दिलेल्या माहितीवर वेगवेगळे प्रश्न तसेच प्रतिप्रश्न देखील ईडीकडून विचारण्यात आले.
प्रकरण वेगळं, चौकशी वेगळीच
या चौकशीनंतर जयंत पाटलांनी शरद पवारांशी संवाद साधला. शरद पवारांनी चौकशीबाबत प्राथमिक माहिती पाटलांकडून घेतली. त्यामुळे जयंत पाटलांना ज्या आरोपांसाठी चौकशीसाठी बोलवण्यात आले होते, त्याबाबत प्रश्नच विचारण्यात न आल्याचं सुत्रांच्या हवाल्याने समोर आलं आहे. त्याचबरोबर पाटलांनी देखील आयएल अण्ड एफएस कंपनीबाबत प्रश्न विचारले नसल्याचे पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं.
जयंत पाटलांच्या चौकशीवेळी राष्ट्रवादीचे अनेक नेते गैरहजर होते. त्याबाबतही अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. त्यावर अजित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीमध्ये जयंत पाटील एकटे पडले आहेत का अशी देखील शंका उपस्थित केली जात आहे. असं असलं तरी आता ईडी पाटलांना पुन्हा चौकशीला बोलावणार की पाटील म्हणतात त्याप्रमाणे ईडीचं समाधान झालं असणार हे येत्या काळात समोर येईल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT