Devendra Fadnavis: ‘राष्ट्रवादीचं ‘ते’ पत्र माझ्या घरातच टाइप केलं..’, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
India Today Conclave Devendra Fadnavis: राष्ट्रपती राजवट लागू व्हावी यासाठी आपण सत्ता स्थापन करु शकत नाही असं पत्र जे राष्ट्रवादी काँग्रेसने दिलं होतं ते पत्र माझ्या घरात टाइप झालं होतं असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
Devendra Fadnavis on Sharad Pawar: मुंबई: महाराष्ट्रात 2019 विधानसभा निवडणुकीनंतर जी राष्ट्रपती राजवट लागली ती शरद पवार (Sharad Pawar) यांचीच आयडिया होती. त्यांच्या सुचनेनुसारच राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. असं अत्यंत खळबळजनक विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये केलं आहे. पण ते एवढ्यावरच थांबले नाही तर राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं याबाबत देखील त्यांनी एक भुवया उंचावणारं विधान केलं आहे. (in 2019 ncp letter was typed in my house devendra fadnavis made a secret blast on president rule bjp maharashtra politics india today conclave)
2019 विधानसभा निवडणुकीनंतर एक गोष्ट स्पष्ट झाली की, राज्यात कोणीही एकमेकांच्या मदतीशिवाय सत्ता स्थापन करू शकत नाही. त्यातच भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून मोठी दरी निर्माण झाली. त्यामुळे शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी सत्ता स्थापन करण्यासाठी बोलणी सुरू केली. पण पडद्यामागे भाजप बऱ्याच हालचाली करत होतं.
हे ही वाचा>> Guardian Minister: अजित पवारांपुढं भाजप नमलं, दादांनी ‘हवं ते’ घेतलं; पालकमंत्र्यांची नवी यादी जाहीर!
फडणवीसांच्या दाव्यानुसार, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजेच शरद पवार यांच्याशी बऱ्याचदा चर्चाही झाल्या होत्या. पण आपल्याला थेट भूमिका बदलता येणार नाही म्हणून आधी राष्ट्रपती राजवट लागू केली जावी असं शरद पवारांनी सुचवलं होतं. असं फडणवीस म्हणाले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
मात्र, यापेक्षाही अधिक खळबळजनक दावा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला आहे.
‘ते’ पत्र माझ्या घरी, मी स्वत: टाइप केलेलं…
राष्ट्रपती राजवट ही शरद पवारांची कल्पना आहे याच विषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, “बघा, ते नव्या-नव्या गोष्टी सांगत असतात. एक दिवस त्यांनी सांगितलं की, राष्ट्रपती राजवट उठवायची होती म्हणून मी हे केलं. आता मी तुम्हाला त्याचं पूर्ण सत्य सांगतो. हे मी राखून ठेवलं होतं. राष्ट्रपती राजवट लागू करण्याची कल्पनाच शरद पवारांची होती. शरद पवारांनी सांगितलं की, मी इतक्या लवकर भूमिकेवरून यू टर्न घेऊ शकत नाही. तुम्ही राष्ट्रपती राजवट लावा.”
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> सहा महिने नाही, अजित पवारांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवणार -देवेंद्र फडणवीस
“राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर मी महाराष्ट्राचा दौरा करेन. नंतर मी भूमिका घेईन की, महाराष्ट्राला स्थिर सरकार हवं यासाठी आम्ही भाजपसोबत जात आहोत. त्यानंतर आपलं संख्याबळ तयार झालं की, राष्ट्रपती राजवट आपोआप उठवली जाईल. इतकंच नाही, तर त्यापुढचंही सांगतो.’
ADVERTISEMENT
‘राष्ट्रपती राजवट जेव्हा लागते, तेव्हा प्रत्येक पक्षाला पत्र देऊन विचारलं जातं की, तुम्ही सरकार बनवणार का? तसंच पत्र राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं गेलं. आणि आम्ही सरकार बनवणार नाही, हे जे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचं होतं ते मी टाईप केलं होतं. ते माझ्या घरी टाईप केलं होतं. त्यात शरद पवारांनी दुरुस्ती करायला सांगितली. ते बदल करून पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दिलं गेलं. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लावण्यात आली होती. बघा शरद पवार मोठे व्यक्ती आहेत. अनेक गोष्टी बोलतात, पण सत्य हे आहे की, शिवसेनेने विश्वासघात केला. त्यावेळी शरद पवारांनीच आमच्यासोबत चर्चा केली होती. आमच्यासोबत सरकार बनवू इच्छित होते.” असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ज्यामुळे आता राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.
ADVERTISEMENT