विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी तुटण्याचा धोका? समजून घ्या 5 संकेतांचे अर्थ
इंडिया आघाडीला तडे जाण्यास सुरुवात झालीये का? काँग्रेस आणि आम आदमी पक्षातील वादाचा अर्थ काय, त्याचा इंडिया आघाडीवर काय होऊ शकतो परिणाम? ममता बॅनर्जींची तृणमूल आणि काँग्रेस संघर्ष का आहे धोकादायक?
ADVERTISEMENT

India Alliance Explained in Marathi : इंडिया आघाडीचे विरोधकांची मोट बांधण्याचे स्वप्न भंग पावण्याच्या मार्गावर आहे का? गेल्या काही दिवसांतील राजकीय घडामोडींवर नजर टाकली तर असंच दिसून येत आहे. आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमधील वाद शिगेला पोहोचला आहे. पंजाबमधील काँग्रेस आमदाराच्या अटकेनेही असेच संकेत दिले आहेत. छत्तीसगडमध्ये निवडणूक लढवण्याची समाजवादी पक्षाची तयारी, आरजेडी आणि जेडीयूमधील संघर्ष, अधीर रंजन चौधरी आणि ममता बॅनर्जी यांच्यातील कलह ही अशी काही उदाहरणे आहेत, जी लक्षात घेतली तर सर्वसामान्य माणूसही विरोधकांचं ऐक्य म्हणजे चार दिवसांचं चांदणे आहे का? असे म्हणेल. दुसरीकडे एनडीए आघाडीचा आकार सातत्याने वाढत आहे. जेडीएसचा एनडीएमध्ये प्रवेश आणि बीजेडीने मोदी सरकारची स्तुती केली आहे.
1) 2019 ची पुनरावृत्ती होण्याची विरोधकांना भीती?
इंडिया आघाडीच्या विघटनाबाबत निर्माण झालेल्या भीतीमागे विरोधी ऐक्याचा इतिहास, हे एक मोठे कारण आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी असे प्रयत्न झाले होते, पण ते शक्य झाले नाही. तेलुगू देसम पक्षाचे सुप्रीमो चंद्राबाबू नायडू आणि बीआरएस नेते केसीआर यांनी विरोधकांना मोदी सरकारच्या विरोधात एकजुटीने निवडणूक लढवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळची परिस्थिती आणि आजचे राजकारण खूप बदलले आहे.
हेही वाचा >> Fact Check: लंडनमधील ‘ती वाघनखं’ खरंच शिवाजी महाराजांनी वापरलेली, काय आहे सत्य?
यावेळी विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करणारे दक्षिणेचे दोन्ही सिंह शांत झाले आहेत. राजकीय वातावरणाची नाडी जाणण्यात माहीर असलेले नितीश कुमार यांनी त्यांची जागा घेतली आहे. ज्यांच्यावर खुद्द त्यांचा खास मित्र राष्ट्रीय जनता दल (RJD) देखील विश्वास ठेवत नाही. नितीश कुमार यांना विरोधकांसोबत राहण्याबाबत दररोज विधाने करावी लागतात.
2) नितीश कुमारांवर भाजपमध्ये येण्यासाठी दबाव वाढतोय?
इंडिया अलायन्सची स्थापना झाल्यापासून नितीश कुमार यांच्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. कधी नितीश कुमार संयोजक बनण्याबाबत लालू प्रसादांच्या वक्तव्यामुळे, तर कधी नितीश कुमार यांनी जी-20 परिषदेत पीएम मोदींना दिलेला पाठिंबा आदींमुळे त्यांच्याबद्दल विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.