शिंदेंनी ‘तो’ मुद्दा छेडला, जितेंद्र आव्हाड भडकले; म्हणाले, “असे कृत्य घडू नये”

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

jitendra awhad criticize cm eknath shinde on promise of malanggad free malanggad harinam saptah
jitendra awhad criticize cm eknath shinde on promise of malanggad free malanggad harinam saptah
social share
google news

Jitendra Awhad Criticize Cm Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मलंगडावरून (malanggad)  धर्मवीर आनंद दिघे यांच्या मलंगगड मुक्तीच्या आंदोलनाची आठवण काढत उपस्थितांना मलंगगड मुक्तीचे आश्वासन दिले आहे. या त्यांच्या आश्वासनानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री शिंदेंवर चांगलेच भडकले आहेत. अनेक वर्षे जिथे हिंदू- मुस्लीम सामंजस्याने राहतात, त्या सामंजस्याला नख लावू नका, अशा शब्दात जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad)  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. (jitendra awhad criticize cm eknath shinde on promise of malanggad free malanggad harinam saptah)

ADVERTISEMENT

खरं तर मलंगगडावरून हिंदु आणि मुस्लिम समाजात गेल्या अनेक वर्षापासून वाद चालू आहे. या मलंगगडावर दोन्ही समाजांकडून दावा केला जात आहे. त्यात काही वर्षापूर्वी धर्मवीर आनंद दिघे यांनी मलंगड मुक्तीचे आंदोलन केले होते. याच आंदोलनाची आठवण काढत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगगड मुक्तीचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या याच भाषणाचा व्हिडीओ आता जितेंद्र आव्हाडांनी एक्स या सोशल मीडियावर शेअर करत आक्षेप घेतला आहे.

हे ही वाचा : Lok Sabha 2024 : दक्षिणेचा किल्ला भेदण्यासाठी मोदी मैदानात, भाजपचं ‘मिशन साऊथ’ काय?

तुम्ही आता एकनाथ शिंदे राहिला नाहीत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाला आहात. त्यामुळे ज्या मलंगगडावर अनेक वर्षे हिंदू- मुस्लीम सामंजस्याने राहतात, त्या सामंजस्याला नख लावू नका, अशी टीका आव्हाडांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली. तसेच आपली अशी इच्छा आहे, असे मला वाटत नाही, पण जे होतेय,ते समजण्यापलिकडे असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणालेत. आपल्या हातून दोन्ही समाजात शांतता, सामंजस्य भंग आणि धर्माधर्मात तेढ निर्माण होऊन वातावरण बिघडेल, असे कृत्य करू नका, असेही आवाहन आव्हाडांनी यावेळी केले आहे.

हे वाचलं का?

आव्हाडांची एक्स पोस्ट जशीच्या तशी…

मा. मुख्यमंत्री साहेब, आपण आपल्या भाषणात काय उद्देशाने बोलता; आपण मनात काय ठेवून भाष्य करता, आपल्या वक्तव्यांमध्ये स्पष्टता नाही. अनेक वर्षे जिथे हिंदू- मुस्लीम सामंजस्याने राहत आहेत. त्या सामंजस्याला नख लागू नये, अशी आपली इच्छा असेल, असे मला वाटते. पण, जे केले जातेय, ते समजण्यापलिकडे आहे. मुख्यमंत्री साहेब आपण आता फक्त एकनाथ शिंदे नाहीत तर आता आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहात. दोन्ही समाजात शांतता, सामंजस्य भंग आणि धर्माधर्मात तेढ निर्माण होऊन आपल्या हातून वातावरण बिघडेल, असे कृत्य घडू नये; हे अर्थात, आपला तसा स्वभावही नाही. पण, आपण असे का वागतात, हे कळत नाही.

हे ही वाचा : Hit And Run: अखेर समेट झाला! ट्रक चालकांना संप मागे घेण्याचे आवाहन

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री काय म्हणाले?

मलंगडाच्या बाबतीत आपल्या सर्व भावना आम्हाला माहिती आहेत. मलंगडामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मलंगड मुक्तीचे आंदोलन सुरु केले. त्यामुळेच जय मलंग, श्री मलंग आपण म्हणू लागलो. पण काही गोष्टी जाहिरपणे बोलता येत नाही. पण आपल्या मनातल्या भावना मलंगगड मुक्तीच्या आहेत.त्या पुर्ण केल्याशिवाय हा एकनाथ शिंदे गप्प बसणार नाही, असे विधान करून एकनाथ शिंदे यांनी मलंगगड मुक्तीचे आश्वासन दिले होते. मुख्यमंंत्री शिंदे श्रीमलंगगड हरिनाम सप्ताहात बोलत होते.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT