‘दंगली घडवायच्या…’, जितेंद्र आव्हाडाच्या विधानावर देवेंद्र फडणवीस संतापले
Devendra Fadnavis Criticize Jitendra Awhad : दंगलीकरीता रामनवमी किंवा हनुमान जयंती साजरी केली जाते असे म्हणणे, हा रामभक्तांचा अपमान असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाडांवर केली.
ADVERTISEMENT
Devendra Fadnavis Criticize Jitendra Awhad :रामनवमी, हनुमान जयंती केवळ दंगली घडवण्यासाठीच झालीत की का? असे विधान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केले होते. आव्हाडांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिलीय. दंगलीकरीता रामनवमी किंवा हनुमान जयंती साजरी केली जाते असे म्हणणे, हा रामभक्तांचा अपमान असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाडांवर केली. तसेच तुम्ही काही ठरवलं आहेत का? दंडली घडवायच्या असा त्याचा अर्थ आहे का? असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला. (jitendra Awhad statement will insult Ram devotees Devendra Fadnavis criticizes)
ADVERTISEMENT
देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) केलेल्या विधानावर तिखट प्रतिक्रिया दिली. जितेंद्र आव्हाडांचे विधान आक्षेपार्ह आहे. रामनवमी असो किंवा हनुमान जयंती असो,अत्यंत शांततेने साजरी केली जाते. लोकांच्या मनामध्ये प्रभू श्रीरामांच्या प्रती आणि हनुमानांच्या प्रती प्रचंड श्रद्धा आहे. ती श्रद्धा त्यानिमित्त व्यक्त केली जाते, असे फडणवीस यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पद कसं गेलं?, अजित पवारांनी सांगितली Inside Story
दंगलीकरीता रामनवमी किंवा हनुमान जयंती साजरी केली जाते असे म्हणणे हा समस्त समाजाचा आणि रामभक्तांचा अपमान असल्याचे देखील फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहे. तसेच महाराष्ट्रात भविष्यात दंगली घडतील, असे वक्तव्य करणे याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? तुम्ही काही ठरवलं आहे का? दंडली घडवायच्या असा त्याचा अर्थ आहे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. जितेंद्र आव्हाडांचे वक्तव्य चुकीचे आहे. अशा प्रकरणांमध्ये संवेदनशील वागले पाहिजे, संवेदनशील बोलले पाहिजे, सनसनाटी बोललं पाहिजे असे काही गरजेचे नाहीये, असा सल्ला देखील देवेंद्र फडणवीसांनी जितेंद्र आव्हाडांना दिला.
हे वाचलं का?
आव्हाडांविरोधनात FIR दाखल करण्याची मागणी
जितेंद्र आव्हाडांचे (Jitendra Awhad) हिंदू समाजाच्या विरोधातील हे वक्तव्य महापालिका निवडणुकीत राजकीय फायद्यासाठी असल्याचे आचार्य पवन त्रिपाठी यांनी आरोप केला. कोट्यावधी जनता ज्या हिंदू देवी- देवतांना पुजते, त्यांच्या विरोधात अशा विधानांची गरज नाही. एका चांगल्या हेतूने आयोजित केलेल्या कार्यक्रमात आव्हाड यांनी फालतू वक्तव्य केल्यामुळे, हिंदू समाज दुखावला आहे,असे देखील त्रिपाठी म्हणाले आहेत. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी करणारे पत्र मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने झोन-10 चे पोलीस उपायुक्त महेश रेड्डी यांना दिले आहे. आता जितेंद्र आव्हाडावर कारवाई होते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा : राजकीय नसबंदी…,भाजपचे पाळलेले पोपट, संजय राऊतांची मनसेवर टीका
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT