Kanhaiya Kumar: ‘अजित पवार भाजपात गेल्यावर ईडी….’ कन्हैया कुमारची टीका
अजित पवार महाविकास आघाडीत होते तेव्हा भ्रष्टाचारी होते. पण ते भाजपात गेल्यावर ईडी झोपेची गोळी खाऊन झोपली आणि अजित पवारांचा पत्ताच देखील विसरली,अशी टीका काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
अजित पवार महाविकास आघाडीत होते तेव्हा भ्रष्टाचारी होते. पण ते भाजपात गेल्यावर ईडी झोपेची गोळी खाऊन झोपली आणि अजित पवारांचा पत्ताच देखील विसरली,अशी टीका काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी केली आहे. तसेच कन्हैया कुमार यांनी भाजपवर देखील हल्ला चढवला आहे. भाजपचा इतिहास आणि घराणेशाहीवर कन्हैया कुमारने टीका केली आहे.
ADVERTISEMENT
भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 79 व्या कोल्हापूरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात कन्हैया कुमार यांनी हजेरी लावली होती.यावेळी कन्हैया कुमार बोलत होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष इथे बसले आहेत,तुम्ही खरे राष्ट्रवादीत आहात, ते विकलेल्या राष्ट्रवादीचे आहेत, असा निशाणा कन्हैया कुमार यांनी साधत अजित पवार यांचे नाव न घेता टीका केली. तसेच भाजपचे जे इलेक्शन डिपार्टमेंट आहे ना ED,यांची पुर्ण सरकारचं या ईडी आणि सीडीवर चालली आहे….एक तर ईडी पाठवतात नाहीतर सीडी पाठवतात, ज्याची ईडी आणि सीडी नाही आहे तो खरा आहे, आणि ज्याची ईडी आणि सीडी आहे तो खोटा आहे, तो खोट्यासोबत उभा आहे, अशी टीका देखील कन्हैया कुमार यांनी अजित पवारांवर केली.
अजित पवार महाविकास आघाडीत होते, तेव्हा भ्रष्टाचारी होते. जेव्हा पंतप्रधान मोदींनी त्यांच्यावर 75 कोटी रूपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला. मग ते भाजपला जाऊन मिळाले. अजित पवार भाजपात गेल्यावर ईडी झोपेची गोळी खाऊन झोपली आणि अजित पवारांचा पत्ताच विसरली, असे देखील कन्हैया कुमार म्हणाला आहे.
हे वाचलं का?
घराणेशाहीवरून भाजपला घेरलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी इतिहासात नापास झाले आहेत. मी खोट बोलत नाही आहे, ही खरी गोष्ट आहे. मी खोट बोलत नाही कारण मी भाजपमध्ये नाही, असा टोला देखील कन्हैया कुमारने भाजपला लगावला. भाजपचा इतिहास देशासोबत गद्दारी करण्याचा इतिहास आहे. देशाचे लोक ज्यावेळेस इंग्रजांसोबत लढत होते, तेव्हा यांची लोक इंग्रजांसोबत चाय पे चर्चा करत होती, इंग्रजांसाठी हेरगिरी करत होती, अशी टीका देखील कन्हैया कुमार यांनी भाजपवर केली.
राहुल गांधीचे खासदार बनणे हे घराणेशाही आहे, मग अमित शहाचा मुलगा बीसीसीआयचा सेक्रेटरी बनणे त्यात घराणेशाही नाही का? ज्योतिरादित्य शिंदे, युपीएमध्ये होते, त्यांचे वडीलही मंत्री होती, जोपर्यंत ते काँग्रेसमध्ये होते, तोपर्यंत घराणेशाही होती. आता मोदींचा बाजूला बसून घराणेशाहीवर टाळ्या वाजवतात. मेनका गांधी-वरूण गांधींच्या भाजपात घराणेशाही नाही,असा सर्व संदर्भ देत कन्हैया कुमारने घराणशाहीवरून भाजपवर हल्ला चढवला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT