karnataka election : मनसेचा पाठिंबा कुणाला? राज ठाकरेंनी मांडली भूमिका

मुंबई तक

ADVERTISEMENT

mns president Raj thackeray says marathi speaking people from border area should cast their vote to marathi candidate.
mns president Raj thackeray says marathi speaking people from border area should cast their vote to marathi candidate.
social share
google news

कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून, काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट तर जेडीएसमुळे काही ठिकाणी तिरंगी लढती बघायला मिळणार आहे. दरम्यान, सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीनंही उमेदवार मैदानात उतरवले असून, महाराष्ट्रातील नेत्यांना प्रचारासाठी येण्याचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अखरेंच्या दिवशीच त्यांची भूमिका स्पष्ट केली.

ADVERTISEMENT

कर्नाटकात होत असलेल्या निवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्रातील नेतेही उतरले आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आदी पक्षाचे नेते प्रचार करताना दिसले. ठाकरे गटाने उमेदवार दिलेले नसून, संजय राऊत हे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या प्रचाराला गेले होते.आता राज ठाकरे यांनीही सीमाभागातील मराठी बांधवांना आवाहन केलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कुणाला दिला पाठिंबा?

राज ठाकरे यांनी सोशल मीडियातून भूमिका मांडली आहे. राज ठाकरे म्हणतात, “कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या १० मे ला मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने मराठी उमेदवारालाच मतदान करा. उमेदवार कुठल्या पक्षाचा का असेना तो मराठी असायला हवा, आणि त्याने निवडून आल्यावर मराठी भाषेची सुरु असलेली गळचेपी, मराठी माणसांवर सुरु असलेला वर्षानुवर्षांचा अन्याय ह्याविरोधात तिथल्या विधानभवनात वाचा फोडायलाच हवी.”

हे वाचलं का?

हेही वाचा >> अजितदादा नाही तर सुप्रिया सुळेंमुळे शरद पवारांनी राजीनामा घेतला मागे?

“तुम्ही ज्या राज्याचे आहात, त्या राज्याची भाषा, तिथली संस्कृती ह्याचा आदर केलाच पाहिजे, ह्या ठाम मताचा मी आहे. सीमाभागात कित्येक पिढ्या राहणारे बांधव कन्नड भाषा आणि इथली संस्कृती ह्याचा मान राखत आले आहेत. पण तरीही तिथलं सरकार जर मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही”, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे.

आवाज उठवायला लोक हवीत -राज ठाकरे

राज ठाकरे पुढे म्हणतात, “मध्यंतरी जेव्हा पुन्हा एकदा सीमावदाला कर्नाटक सरकारकडून खतपाणी घालून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा मी म्हणलं होतं की कर्नाटक आणि महाराष्ट्रात मुळात एकजिनसीपणा आहे. इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत.”

ADVERTISEMENT

हेही वाचा >> कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री कोण? ‘हा’ नवा चेहरा की जुन्याला लागणार लॉटरी!

“थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. तेव्हा खरंतर कर्नाटक सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली तर संघर्षाची वेळच येणार नाही. पण कुठल्याही पक्षाचं सरकार तिकडे येऊ दे त्यांच्या वागण्यात यत्किंचितही फरक नसतो. म्हणूनच तिथल्या विधानभवनात मराठी भाषिक आमदार, जो त्या भागातील मराठी अस्मितेचं प्रतिनिधित्व करेल, मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवेल अशी लोकं असायला हवीत”, असं मत राज ठाकरेंनी मांडलं.

ADVERTISEMENT

“ह्यासाठी सीमाभागातील लोकांना १० मे ला संधी आहे. मराठी आमदारच निवडून येतील हे तुम्ही पाहायला हवं, हे तुमच्या आणि पर्यायाने मराठी भाषेच्या हिताचं आहे. ही संधी दवडू नका”, असं आवाहन राज ठाकरेंनी महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिक मतदारांना केलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT