Lok Sabha 2024: जागा वाटपाबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान, काँग्रेसबद्दल काय म्हणाले?
Uddhav Thackeray: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (UBT) आणि काँग्रेस यांच्यात जागा वाटपावरून सुंदोपसुंदी पाहायला मिळत आहे. मात्र, याचबाबत आता उद्धव ठाकरेंनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.
ADVERTISEMENT
Uddhav Thackeray on Seat Sharing: मुंबई: लोकसभा निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशावेळी भाजपला टक्कर देण्यासाठी सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात जागा वाटपावरून आपआपसात टीकाटिप्पणी सुरू झाली आहे. प्रामुख्याने शिवसेना (UBT) आणि काँग्रेसमध्ये यावरून एकमेकांवर बरीच टीका सुरू होती. मात्र, आज (30 डिसेंबर) उद्धव ठाकरेंनी एक मोठं विधान केलं आहे. (lok sabha 2024 election uddhav thackeray big statement about seat sharing what did he say about congress)
‘माझ्याकडून आघाडीमध्ये बिघाडी होऊ देणार नाही. म्हणून कोण काय बोलतं त्याकडे लक्ष न देता.. काँग्रेसचे जे प्रमुख आहेत ते आमच्याशी बोलत नाही तोवर मी किंवा आमच्याकडून कोणीही यावर भाष्य करणार नाही.’ असं स्पष्टपणे म्हणत उद्धव ठाकरेंनी या संपूर्ण चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
हे ही वाचा>> Ram Mandir : ‘फडणवीसांच्या वजनामुळे बाबरी पडली..’, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
पाहा उद्धव ठाकरे जागा वाटपाबाबत नेमकं काय म्हणाले…
लोकसभेचे पडघम वाजायला लागले आहेत. माझ्या माहितीनुसार, निवडणूक कदाचित 30 एप्रिलच्या आत करतील.. कारण त्यांना सांगितलं आहे की, त्याआधी निवडणुका घेतल्या तर तुमचं ठीक होईल. 30 एप्रिलपर्यंत निकाल लागला पाहिजे असं त्यांना कोणीतरी सांगितलं आहे.. असं माझ्या कानावर आलं आहे. पण जागा वाटप आमच्या महाविकास आघाडीचा सुरळीत होईल.. राष्ट्रवादी आणि आमची बोलणी चाललेली आहेत, झालेली आहेत व्यवस्थित.. इंडियाची जेव्हा बैठक झाली दिल्लीत.. तेव्हा मी खर्गे आणि राहुलजींशी बोललेलो आहे. त्यामुळे सगळं सुरळीत होईल.
इकडे ज्या बातम्या येत आहेत त्याकडे लक्ष देऊ नका. कारण तसा कोणताही निरोप मला त्यांच्या श्रेष्ठींकडून आलेला नाही.
माझ्याकडून आघाडीमध्ये बिघाडी होऊ देणार नाही. म्हणून कोण काय बोलतं त्याकडे लक्ष न देता.. काँग्रेसचे जे प्रमुख आहेत ते आमच्याशी बोलत नाही तोवर मी किंवा आमच्याकडून कोणीही यावर भाष्य करणार नाही.
वंचित बरोबर देखील आमची बोलणी सुरू आहे. याबाबत एकत्र बैठक होईल. माझ्याकडे कोणताही फॉर्म्युला आलेला नाही. त्यामुळे जे काही प्रत्यक्ष भेटून मी आणि ते बोलत नाही तोवर त्याबाबत मी बोलणं योग्य नाही. राष्ट्रवादीसोबत आमचा जागा वाटपाचा प्रश्न सुटला आहे. असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा>> Ayodhya Ram Temple: ‘मला निमंत्रण…’, उद्धव ठाकरेंनी कॅमेऱ्यासमोरच सांगून टाकलं!
आता उद्धव ठाकरेंच्या या स्पष्टीकरणानंतर इंडिया आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कशा प्रकारे जागावाटप करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT