Sunetra Pawar: कोण आहेत सुनेत्रा पवार?, ज्या शरद पवारांच्या मुलीलाच देणार बारामतीच्या बालेकिल्ल्यात टक्कर

मुंबई तक

Sunetra Pawar Lok Sabha Election 2024: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आजवर सक्रिय राजकारणापासून दूर राहिल्या पण आता त्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. जाणून घ्या सुनेत्रा पवार कोण आहेत.

ADVERTISEMENT

कोण आहे सुनेत्रा पवार?
कोण आहे सुनेत्रा पवार?
google news

बातम्या हायलाइट

point

कोण आहेत सुनेत्रा पवार

point

सुनेत्रा पवार बारामतीतून लढणार?

point

सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवार?

Who is Sunetra Pawar: मुंबई: महाराष्ट्रात यंदाच्या लोकसभा निवडणूक अत्यंत रंजक लढती होणार आहेत. अशातच पवार घराण्याचा बालेकिल्ला असलेल्या बारामती (Baramati) मतदारसंघाकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जिथे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कन्या आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना त्यांच्याच वहिनी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याशी स्पर्धा करावी लागण्याची शक्यता आहे. खुद्द अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीच्या चर्चांना खतपाणी घातले आहे. (lok sabha election 2024 who is sunetra pawar who is going to give competition to sharad pawar daughter supriya sule in the family stronghold baramati)

बारामतीत शुक्रवारी अजित पवार यांनी कोणाचेही नाव न घेता आपल्या मतदारांना भावनिक आवाहन केले की, 'पुढील सार्वत्रिक निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या पण अनुभवी लोकांसोबत राहणाऱ्या उमेदवाराला निवडून द्या.' अजित पवार यांनी आपल्या भाषणात पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव न घेता आगामी निवडणुकीत पत्नी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचे संकेत मात्र दिले आहेत.

कोण आहेत सुनेत्रा पवार?

60 वर्षीय सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या पत्नी आहेत. त्या राज्यातील एका मोठ्या राजकीय घराण्यातील आहेत. त्यांचे भाऊ पद्मसिंह पाटील हे माजी मंत्री होते, तर त्यांचे भाचे राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील हे उस्मानाबादचे भाजपचे आमदार आहेत. अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना दोन मुलं आहेत. जय आणि पार्थ पवार. जय हा कौटुंबिक व्यवसाय चालवतो, तर पार्थ पवार  हे राजकारणात आहे. पार्थ पवार यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक मावळ मतदारसंघातून लढवली होती. पण त्यात त्यांना यश आले नव्हते.

सुनेत्रा पवार या आजवर सक्रिय राजकारणापासून दूर राहिल्या पण समाजसेवेच्या कार्यात त्या सक्रियपणे सहभागी झाल्या आहेत. 2010 मध्ये स्थापन झालेल्या एनजीओ एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या त्या संस्थापक आहेत. भारतातील इको-व्हिलेजची संकल्पना विकसित करण्यात त्या मार्गदर्शक ठरल्या आहेत, असे अधिकृत वेबसाइटवर म्हटले आहे.

हे वाचलं का?